राजापूर-शिक्षक करतायत पथनाट्यातून मतदानाची जागृती

राजापूर-शिक्षक करतायत पथनाट्यातून मतदानाची जागृती

rat30p8.jpg
80687
राजापूर : शहरातील जवाहरचौकामध्ये पथनाट्याचे सादरीकरण करताना शिक्षक.
----------------

शिक्षकांकडून पथनाट्यातून मतदानाची जागृती
राजापूर प्रशासनाच्या पुढाकाराने विविध उपक्रमातून प्रबोधन
राजापूर, ता. ३०ः लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून तालुक्यातील शिक्षक कलाकार मतदारांमध्ये जनजागृती करत आहेत. सुरेल संगीताची साथ असलेल्या सुमारे बावीस-तेवीस मिनिटांच्या पथनाट्यातील बतावणीद्वारे मतदान करून ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’, असे आवाहन साऱ्या मतदारांना केले जात आहे. सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी सादर केल्या जाणाऱ्या पथनाट्यामध्ये शिक्षक कलाकारांकडून उत्कृष्ट अभिनय अन् बतावणी करत मतदार जनजागृती विषयाची केली जाणारी मुद्देसुद मांडणी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करणाऱ्या शिक्षक कलाकारांमध्ये मेघनाथ गोसावी, दीपक धामापूरकर, चांगदेव गोसावी, संदीप पवार, समीर देशपांडे, प्रभाकर सावंत, निलीमा गोरे, अहिल्या बंडगर, धनश्री कांबळे यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून, यामध्ये राजकीय पक्षांसह उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. निवडणुकीची वातावरणनिर्मिती झाली आहे. या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाची पूर्वतयारी करण्यामध्ये प्रशासन गुंतले आहे. त्याचवेळी गतवेळीपेक्षा मतदानाचा टक्का वाढावा यासाठीही प्रशासन प्रयत्नशील आहे. राजापूर मतदार संघामध्ये मतदार जनजागृती करणारे विविध उपक्रम प्रशासनाकडून राबवले जात आहेत. तालुक्यातील शिक्षकांकडून पथनाट्याच्या सादरीकरणाद्वारे जनजागृती केली जात आहे. यामध्ये पथनाट्यातील सहभागी कलाकार साऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी मुद्देसुद बतावणी करत प्रबोधन करत आहेत.

चौकट
युवकांनो, आधी मतदान, नंतर...
लोकसभा निवडणुकीमध्ये इतर मतदारांच्या तुलनेमध्ये नवमतदारांचा टक्का जास्त आहे; मात्र युवा मतदार बहुतांशवेळा सोशल मीडियामध्ये अधिक गुंतल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसते. अशा नवमतदारांमध्ये जनजागृती करताना ‘आधी मतदान करा नंतर व्हॉटस्अॅप बघा’, असा संदेश पथनाट्याद्वारे नवमतदारांना देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com