छोटू देसाई अॅकॅडमीने जिंकली

छोटू देसाई अॅकॅडमीने जिंकली

२८ (टूडे पान ३ साठी)

rat३०p५.jpg-
P२४M८०६६५
ओळी ः एकनाथ सोलकर स्मृती चषक पटकावणारे (कै.) छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचे खेळाडू.

टी-२० स्पर्धे छोटू देसाई अॅकॅडमी विजयी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः भारताचे नामांकित कसोटी क्रिकेटपटू व पावस-रत्नागिरीचे सुपुत्र (कै.) एकनाथ सोलकर यांच्या अमृत महोत्सवी स्मृतिप्रित्यर्थ कोळंबे येथील सावंत (सोसा) क्रीडांगणावर झालेल्या पंधरा वर्षाखालील (कै.) एकनाथ सोलकर स्मृती चषक शालेय टी-२० क्रिकेट स्पर्धेत (कै.) छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने विजय मिळवला.
या स्पर्धेमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नवी मुंबई, एसआरआय सावंतवाडी संघ, सिंधुदुर्ग, (कै.) छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमी व सावंत क्रिकेट अॅकॅडमी (सोसा) यांच्यामध्ये चौरंगी स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवण्यात आली. स्पर्धेमध्ये (कै.) छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने तीनही साखळी सामन्यात विजय मिळवून अंतिम सामन्यात सावंत क्रिकेट अॅकॅडमी (सोसा) संघाचा १० गडी राखून पराभव केला व (कै.) एकनाथ सोलकर स्मृती चषक स्पर्धेचे अंतिम विजेतेपद मिळवले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात रत्नागिरीचे उद्योजक गजेंद्रशेठ पाथरे, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य मृत्यूंजय उर्फ लाल्या खातू, या स्पर्धेचे प्रायोजक पावसचे उद्योजक राजूशेठ खातू, शेखर नानरकर तसेच सावंत क्रिकेट अॅकॅडमीचे सर्वेसर्वा केतन सावंत हे उपस्थित होते. मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले. स्पर्धेत (कै.) छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचा संघ विजयी झाला तर सावंत क्रिकेट अॅकॅडमी (सोसा) उपविजेता ठरला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक राजेंद्र यादव, लक्ष्मीकांत पांडे व राकेश सावंत तसेच दर्शना पवार, शैलेश मदने व साहील मदार यांनी पंच म्हणून काम पाहिले. सामन्याचे प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) सोनम चव्हाण यांनी केले. बक्षिस समारंभाचे सूत्रसंचालन दीपक देसाई यांनी केले.
----
उत्कृष्ठ खेळाडू

* मालिकावीर : किरण सुर्वे (सीडीसीए)
* उत्कृष्ट फलंदाज : कुणाल गावडे (सीडीसीए)
* उत्कृष्ट गोलंदाज : अर्णव भाटकर (सीडीसीए)
* उत्कृष्ट क्षेत्ररक्षक : श्रेयस कांबळे (सोसा)
* अष्टपैलू खेळाडू : वेदांत पवार (सीडीसीए)
* मॅन ऑफ दी मॅच : गुरूप्रसाद म्हस्के (सीडीसीए)
* उत्तेजनार्थ : श्रेयस कांबळे, रूद्र लांजेकर (सोसा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com