महाविकास आघाडीच्या प्रचार स्ट्रॅटेजित बदल

महाविकास आघाडीच्या प्रचार स्ट्रॅटेजित बदल

40 ( पान ३ साठी )


- rat30p25.jpg-
24M80745
चिपळुणात महाविकास आघाडीने काढलेली प्रचारफेरी.
----------
महाविकास आघाडीच्या प्रचार पद्धतीत बदल

घराघरात पोहोचण्यावर भर ; कार्यकर्त्यांनी कसली कंबर

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यात खळा बैठका आणि जाहीर सभा घेतल्यानंतर आता शहरासह ग्रामीण भागात घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सर्वप्रथम विद्यमान खासदार विनायत राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरासह तालुक्यात जोमाने प्रचाराला सुरवात केली. महाविकास आघाडीकडून पहिल्या टप्प्यात पंचायत समिती गणनिहाय खळा बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी सभा घेण्यात आल्या. सद्यस्थितीला महाविकास आघाडीकडून शहरासह ग्रामीण भागात घरोघरी मतदारांना भेटी देऊन प्रचारावर भर देण्यात येत आहे. शहरातून प्रचारफेरी काढत मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात आला. आता मतदान होईपर्यंत घरोघरी मतदारांना भेटी देऊन जोमाने प्रचार करण्यावर महाविकास आघाडीकडून भर दिला जात आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या टीम करून सकाळ आणि सायंकाळ सत्रात घरोघरी भेटी देऊन प्रचार यंत्रणा राबवली जात आहे.
------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com