क्राइम

क्राइम

४५ ( पान ३ साठी क्राईइ)

दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी

दाभोळ ः दापोली-मंडणगड मार्गावरील करंजाणी येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुचाकी चालकाविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करंजाणी मावळतवाडी येथील मंगेश रघुनाथ कालेकर (वय ४७) हे २७ एप्रिलला सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात रस्ता ओलांडून जात असताना दापोलीच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या अपघातात कालेकर यांच्या उजव्या पायाला, डाव्या हाताला तसेच छातीला, डोक्याला दुखापत झाली. दुचाकीस्वाराने कालेकर यांना धडक देऊन पलायन केले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मिलिंद चव्हाण करत आहेत.
-------

किरकोळ कारणातून मारहाण, दोघे जखमी

खेड : अंगणात सायकल लावल्याच्या कारणातून दोघांना काठीने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ एप्रिलला शिवबुद्रुक भोईवाडी येथे घडला. जगनलवंदे, जान्हवी लवंदे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी जानकीबाई काशीराम लवंदे (वय ६५) यांनी तक्रार दाखल केली आहे. यातील संशयित जगन लवंदे यांच्या मुलाने त्यांची सायकल फिर्यादी जानकीबाई लवंदे यांच्या अंगणात लावलेली होती. सदरची सायकल काढण्यासाठी फिर्यादी यांचे पती काशीराम लवंदे यांनी सांगितले असता त्या ठिकाणी बाचाबाची व शिवीगाळ करून जगन लवंदे, जान्हवी लवंदे यांनी बांबूच्या काठीने काशीराम लवंदे यांना मारहाण केली. यामध्ये जानकीबाई लवंदे व काशीराम लवंदे हे जखमी झाले.
-------------

हृदयविकाराने वृद्धाचा मृत्यू

खेड : लग्नासाठी मुंबई जुहू येथून आलेल्या एका ५० वर्षीय प्रौढाचा हृदयविकाराने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात २८ एप्रिलला सकाळी मृत्यू झाला. किशोर आत्माराम मोहिते असे त्यांचे नाव आहे. लग्नाची तयारी करण्यासाठी मोहिते यांना उठवण्यासाठी गेले असता त्यांची कोणतीच हालचाल दिसून आली नाही म्हणून ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com