आरोग्य विभागाची अवस्था 
बिकट ः अमित सामंत

आरोग्य विभागाची अवस्था बिकट ः अमित सामंत

80850
वेंगुर्ले ः पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत. सोबत प्रवीण भोसले, अर्चना घारे-परब, नम्रता कुबल आदी.


आरोग्य विभागाची अवस्था
बिकट ः अमित सामंत

विकासाच्या नावाखाली केसरकरांकडून निधी वाया

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३० ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आमदार असलेल्या सावंतवाडी-वेंगुर्ले विधानसभा मतदारसंघात आरोग्य सेवेची बिकट अवस्था झाली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात तर टाके घालण्याचा दोरा सुद्धा उपलब्ध नाही. शिरोडा व वेंगुर्ले या दोन्ही उपजिल्हा रुग्णालयात पगार दिला जात नसल्याने डॉक्टर पळून जात आहेत. विकासाच्या नावावर ३०० ते ४०० कोटींचा निधी कंत्राटदारांच्या हितासाठी केसरकर यांनी वाया घालवला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे केली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक आज येथील विनायक रेसिडेंसी येथील राष्ट्रवादी कार्यालयात झाली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष सामंत बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे-परब, प्रदेश महिला उपाध्यक्ष नम्रता कुबल, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, शहर कार्याध्यक्ष सुहास कोळसुलकर, महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, विधानसभा महिला अध्यक्ष नितेशा नाईक, विधानसभा युवती अध्यक्ष सुनीता भाईप, विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, वेंगुर्ले तालुका उपाध्यक्ष सलील नाबर, विद्यार्थी सेल सावंतवाडी तालुकाध्यक्ष ऋतिक परब, युवती अध्यक्ष आदिती चुडजी, अरविंद मराठे यांच्यासहित कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते विनायक राऊत यांना निवडून आणण्यासाठी एक दिलाने काम करत आहेत. कारण ही निवडणूक आमच्या अस्तित्वाची झालेली आहे. शरद पवार यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते जोमाने काम करत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या फसव्या राजकारणाला जोर आलेला आहे. यात स्थानिक आमदार केसरकर हे सगळ्यात आघाडीवर आहेत. प्रत्येक गोष्टीत खोटे बोलायचे आणि मतदारांची दिशाभूल करायची, हे गेल्या अनेक निवडणुकांतील सूत्र त्यांनी यावेळीही कायम ठेवले आहे. पूर्वीच्या शासनात केसरकर मंत्री होते, आता कॅबिनेट मंत्री आहेत, मग विकासासाठी अजून मुख्यमंत्री बनायचे का? तुम्ही विकास केला असता, तर गावोगावी फिरण्याची काय गरज होती० सर्वसामान्यांनी उन्हाच्या झळा सोसायच्या आणि मंत्र्यांनी व्हॅनिटी व्हॅनमधून फिरायचे? केसरकर यांनी विकासाच्या नावावर १ हजार कोटी रुपये आणले असतील, तर फक्त कंत्राटदारांच्या हितासाठी ३०० ते ४०० कोटी वाया गेलेले आहेत. याला जबाबदार कोण? आधी शरद पवार, नंतर उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला. आता मतदारांचा विश्वासघात करताय. या निवडणुकीत जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.’’
.................
चौकट
भाजपवर टीका
गुजराती लोकांच्या हितासाठी भाजप सरकारने काजूवरचा आयात कर कमी केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये अनेक छोटे कारखानदार असून, त्यांच्यावर अवलंबून अनेक कुटुंब आहेत. त्यांचा विचार या शासनाने का केला नाही? केवळ आपले गुजरातमधले मतदार सांभाळण्यासाठी तिजोरीत अधिक भर पडण्यासाठी भाजपने हे काम केले आहे. जनतेला केंद्रात आणि राज्यात सुद्धा नरेंद्र मोदी नको आहेत. त्यामुळे लोकसभा व विधानसभा हे दोन्ही निकाल यावेळी आश्चर्यकारक असतील, असा दावा सामंत यांनी यावेळी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com