महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्रेरणादायी

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्रेरणादायी

swt23.jpg
81027
सिंधुदुर्गनगरी : येथे महाराष्ट्र दिनानिमित्त परेड संचालन घेण्यात आले.

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्रेरणादायी
किशोर तावडेः सिंधुदुर्गनगरीत ध्वजवंदन सोहळ्यात प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ः महाराष्ट्र दिन हा राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक तसेच सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी महाराष्ट्र दिन कार्यक्रमात सांगितले.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस परेड मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई, तहसीलदार प्रज्ञा काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. बुधावले, उपजिल्हा नियोजन अधिकारी श्री. पवार आदी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची, समाजसुधारक, क्रांतिकारांची भूमी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा राजर्षी शाहू, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोककल्याणाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच महाराष्ट्राची प्रतिभाशाली वाटचाल सुरू आहे. राज्याच्या विकासामध्ये समाजातील सर्वच घटकांचा सिहांचा वाटा आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार यांनी आपल्या घामातून राज्य प्रगतीपथावर नेले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मंगल कलश आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सुपुत्रांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. हे जग कष्टकरी कामगारांच्या श्रमावर चालते, हे सप्रमाण सिध्द करणाऱ्या माझ्या कामगार बांधवांना आजच्या कामगारदिनी मी मनापासून शुभेच्छा देतो. राज्याच्या जडणघडणीत दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सर्व कामगार बांधवांचे देखील मी आभार मानतो. १ मे १९८१ मध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्त्वात आला. त्याला आज ४३ वर्षे होत असून, आपला जिल्हा विकासाकडे घोडदौड करत आहे.’’

चौकट
श्वान ब्राव्होची उत्कृष्ट कामगिरी
श्वान ब्राव्होने (अंमली पदार्थ शोधक) आतापर्यंत कोकण परीक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये १ सिल्व्हर मेडल व १ ब्राँझ मेडल मिळविलेले आहे. ऑक्टोबर २०१७ ते मार्च २०१८ मध्ये ‘बीएसएफ’ श्वान प्रशिक्षण केंद्र, टेक्कनपूर-मध्यप्रदेश येथे प्रशिक्षणादरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामधून व्दितीय क्रमांक मिळविलेला आहे. दरम्यान, महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने परेड संचालन घेण्यात आले. यामध्ये राखीव पोलिस निरीक्षक रामदास पालशेतकर (पोलिस मुख्यालय, सिंधुदुर्ग), सेकंड परेड कमांडर, परीविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक रवींद्र भांड (कुडाळ पोलिस ठाणे), प्लाटून क्रमांक ०१, महिला पोलिस अंमलदार, प्लाटून कमांडर, परीविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक महेश शेडगे (कणकवली पोलिस ठाणे), प्लाटून क्रमांक ०३ होमगार्ड पथक, पोलिस बँड पथक, श्वान पथक चालक, श्वान ब्राव्हो (अंमली पदार्थ शोधक), वज्र वाहन, फॉरेन्सिक लॅब, दंगल नियंत्रक पथक, अग्निशामक बंब, १०८ रुग्णवाहिका यांचा महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने परेड संचालनामध्ये समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com