पोलिसांचे संचलन

पोलिसांचे संचलन

४९ (पान ३ साठी)

-rat३०p३३.jpg-
OP२४M८०८२४
रत्नागिरी ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी संचलन केले.
-----------

ग्रामीण भागात पोलिसांचे संचलन

रत्नागिरी, ता. २ : लोकसभा निवडणुका शांततेत पार पाडाव्यात आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ग्रामीण पोलिसांनी उमरे, चांदेराई, इब्राहिमपट्टण हरचिरी येथील लोकवस्तीतून संचलन करत आपली ताकद दाखवली. लोकसभा निवडणुका शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी पोलिस यंत्रणेवर आहे.
मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावे, पोलिसदल तुमच्या पाठिशी आहे हे दाखवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिस संचलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन ढेरे यांनी त्यांच्या हद्दीतील काही भागांमध्ये संचलन केले. आज सायंकाळी साडेपाच ते साडेसहाच्या सुमारास उमरे, चांदेराई, इब्राहिमपट्टण, हरचिरी येथील लोकवस्तीतून रूट मार्च काढला. रूट मार्चदरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ऑडिओ क्लीप वाजवून निवडणूक शांततेत पार पाडण्याबाबत आवाहन करण्यात आले. या रूट मार्चसाठी ग्रामीण पोलिस ठाण्यातील तीन अधिकारी, १२ अंमलदार व त्रिपुरा एसआरपीचे २ अधिकारी व ३८ जवान सहभागी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com