मोदक प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रतिसाद

मोदक प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रतिसाद

टुडे ३
८१०११

रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघात
मोदक प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रतिसाद
रत्नागिरी, ता. २ : रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने एप्रिल २०२४ मधील सभासदांचा सामूहिक वाढदिवस कार्यक्रम शिवाजीनगर येथील रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात साजरा झाला. यावेळी मोदककार प्रसन्न कांबळी यांनी मोदकांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी केले. संस्थेचे सभासद व प्रसिद्ध मोदककार प्रसन्न कांबळी यांचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर कांबळी यांनी मोदक प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवले. कांबळी यांनी मोदकाचे पिठ कसे तयार करावे, मोदकाचे पुरण करण्यापासून त्यामधील घटक पदार्थ यांची सविस्तर माहिती देऊन उकडीचे मोदक तयार करून दाखवले. त्यांना ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासद उमा दामले यांनी साहाय्य केले. त्यानंतर एप्रिल महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थितांना तयार उकडीचे मोदक खायला देण्यात आले. कांबळी यांचा सुभाष थरवळ यांच्या हस्ते रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. सामूहिक वाढदिवस कार्यक्रमाला देणगी दिलेल्या सभासदांचे आभार मानण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com