नारगोलीत पाणीसाठा असूनही पाच दिवसाआड पाणीपुरवठा

नारगोलीत पाणीसाठा असूनही पाच दिवसाआड पाणीपुरवठा

८ (टुडे पान १ साठी)


-rat२p१४.jpg ः
P२४M८१००५
नारगोली : दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणातील शिल्लक पाणीसाठा.
------------

दापोलीत पाच दिवसाआड पाणीपुरवठा

नारगोली धरणात पुरेसा साठा असूनही वणवण; पर्यटकांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २ : राज्यातील सर्वात जास्त पाऊस कोकणात पडतो; मात्र उन्हाळा आला की, कोकणातील सर्वच मोठ्या शहरात पाण्याच्या नावाने बोंब असते. जिल्ह्यात दापोलीचा याबाबत अग्रक्रम असे म्हणावे लागेल. दापोलीत उन्हाळ्यात पर्यटकांची रीघ लागते; मात्र शहरातील पाणीटंचाईने नागरिक आणि पर्यटक त्रस्त झाले आहेत. पाण्याविना नागरिक व पर्यटकांचे हाल होत आहेत. पावसाळा सुरू व्हायला एक महिना असला तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही नागरिकांना पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. हे पाणीही पुरेसे दिले जात नसल्याने दापोलीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकमेव असणाऱ्या धरणात पाणीसाठा शिल्लक आहे; परंतु दापोली नगरपंचायतीचे उदासीन धोरण, नियोजनाचा अभाव व कामातील दिंरगाई याचा फटका उन्हाळ्यात नागरिकांना सहन करावा लागत आहे. नगरपंचायत शहरात पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा करते तेव्हाच वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या आहे. त्यामुळे ज्या दिवशी पाणी येणार असते त्याच दिवशी वीजपुरवठा खंडित होतो. यासाठी नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कारण, नारगोली येथे धरणाच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला तर पर्यायी वीजपुरवठ्यासाठी नगरपंचायतीने जनरेटर बसवले आहेत; मात्र हे जनरेटर वापराविना पडून आहेत. हे जनरेटर सुरू करून त्याचा उपयोग पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नारगोली धरणात पाणीसाठा कमी असेल तर मागील वर्षाप्रमाणे बांधतिवरे येथील धरणातून टँकरने पाणीपुरवठा करावा व दापोलीच्या नागरिकांना दररोज अथवा एक दिवसाआड पाणी कसे मिळेल, याची व्यवस्था ताबडतोब करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील नागरिकांना वर्षभराची पूर्ण पाणीपट्टी भरूनही आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. परिणामी, नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांना दुप्पट आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी दापोलीतील नागरिकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com