बोअरवेल, विहिरींमध्ये पाण्याचा खडखडाट

बोअरवेल, विहिरींमध्ये पाण्याचा खडखडाट

५ (टुडे पान १ साठी, मेन)


-rat२p११.jpg -
२४M८०९८९
गुहागर : पाणीटंचाईबाबतची पाहणी करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव.
-------------
बोअरवेल, विहीरींमध्ये पाण्याचा खडखडाट

परिक्षित यादव यांच्याकडून टंचाईचा आढावा; गावांमध्ये जलस्रोत वाढवण्यासाठी उपाय करा
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २ : तालुक्यातील ६० बोअरवेल आणि विहिरींमध्ये पाण्याचा खडखडाट आहे. केवळ मोडकाआगर धरणच गुहागर तालुक्याची तहान भागवू शकते, असा अहवाल पाणीपुरवठा विभागाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांच्यासमोर सादर केला. त्या वेळी पाणीटंचाई आहे म्हणून टँकरने पाणीपुरवठा करणे हा पर्याय होऊ शकत नाही. समस्याग्रस्त गावात जलस्रोत वाढवण्यासाठी उपाययोजना करा, अशा सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी केल्या.
परिक्षित यादव यांनी गुहागर पंचायत समितीमध्ये नऊ गावातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. कायमस्वरूपी उपाययोजना यावर मार्गदर्शन केले तसेच टंचाईमुक्त गावांची, जलजीवनच्या कामांची पाहणी केली. आढावा बैठकीच्या सुरवातीला ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता मंदार छत्रे यांनी तालुक्यातील पाणीटंचाईचा अहवाल सादर केला. सध्या सडेजांभारी, शिवणे व थोपावे येथील गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. रानवी गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. ६० बोअरवेलमध्ये पाण्याचा खडखडाट आहे. आजच्या स्थितीला या गावांची तहान मोडकाआगर येथील धरण या गावाची तहान भागवू शकते.
यादव म्हणाले, धरणातील पाणी टँकरने पुरवणे हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक गावाला मोडकाआगर धरणातून देण्याचा पर्याय निवडताना त्याचा खर्च जनतेवरच पडणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. हा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जेवर आधारित पंपहाऊस उभे करावे लागतील. याचा अहवाल पाठवावा; मात्र कायमस्वरूपी उपाययोजनांमध्ये भूजलपातळी वाढवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रयोग करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.
या संपूर्ण दौऱ्यात गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता मंदार छत्रे, कृषिविस्तार अधिकारी सर्जेराव कांबळे, गजेंद्र पौनीकर, जिल्हा परिषद बांधकामचे शाखा अभियंता रमेश ढगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जांगीड आदी उपस्थित होते.
---
धोपावे, पाटपन्हाळे, त्रिशुलसाखरीमध्ये पाहणी

परिक्षित यादव यांनी मोडकाघर येथील धोपावे गावासाठीच्या खोदण्यात आलेल्या नळपाणी योजनेच्या विहिरीची पाहणी केली. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. पाटपन्हाळे गावाच्या जलजीवन मिशनअंतर्गतच्या नळपाणी पुरवठा योजनेमधील पाटपन्हाळे कोंडवाडी येथील पाणी साठवणटाकी, विहीर यांची पाहणी केली. वरवेली येथील १ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्पासाठीच्या जागेची पाहणी केली. त्रिशुळसाखरी गवळवाडी येथे भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली. येथील वाडी जलजीवनमध्ये घेण्यासाठी ग्रामस्थांसाठी बैठक घेण्याची सूचना केली. खामशेत गावाने महाराष्ट्र राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधून सर्वाधिक काम केले आहे. तेथील गांडूळखत प्रकल्प व नॅडेप सर्वाधिक आहेत. त्याची पाहणी केल्यानंतर या गावात सेंद्रिय शेती करण्याचे नियोजन करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com