''फ्लाय ९१''ला ''आई.एच.सी. लंडन'' पुरस्कार

''फ्लाय ९१''ला ''आई.एच.सी. लंडन'' पुरस्कार

swt214.jpg
81053
गोवाः ''फ्लाय ९१''ला प्रतिष्ठित आईएचसी लंडन- आईआईएचएम हॉस्पिटॅलिटी ऑनर्स लिस्ट २०२४ पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

‘फ्लाय ९१’ला ‘आई.एच.सी. लंडन’ पुरस्कार
गोव्यात सन्मान सोहळा ः विमानचालनातील कामगिरीची दखल
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ः गोवा स्थित आणि भारतीय विमानचालनातील सर्वात नवीन प्रवेशिका असलेल्या ‘फ्लाय ९१’ ला गोव्यात झालेल्या ‘इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी डे’ समारंभात प्रतिष्ठित आईएचसी लंडन-आईआईएचएम हॉस्पिटॅलिटी ऑनर्स लिस्ट २०२४ पुरस्कार प्राप्त झाला आहे. व्यावसायिक ऑपरेशन्स सुरू केल्याच्या अवघ्या दोन महिन्यांत हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
‘फ्लाय९१’ ला भारतातील टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे प्रवाशांचा अनुभव सुलभ आणि त्रासमुक्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय आदरातिथ्य दिनादरम्यान हा विशेष पुरस्कार मिळाला. आय.आय.एच.एम. आणि आय.एच.सी.चे (यूके) प्रमुख डॉ. सुबोर्नो बोस, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अब्दुल्ला अहमद आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या दिग्दर्शक शबनम हलदर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी डे हा एक जागतिक कार्यक्रम आहे. येथ देशात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या हॉस्पिटॅलिटी व्यवसायांना सन्मानित करण्यात येते. ‘फ्लाय ९१’ सध्या गोवा, हैदराबाद, बंगळूर, अगत्ती, जळगांव आणि सिंधुदुर्ग येथे विमान सेवा देते.
दरम्यान, हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही सन्मानित आणि कृतज्ञ आहोत. ‘फ्लाय ९१’ टीमचे लक्ष्य टियर २ आणि टियर ३ शहरांना जोडण्याचे आहे. अग्रगण्य प्रादेशिक वाहक म्हणून आम्ही कार्यक्षम, आरामदायी आणि अखंड कनेक्टिव्हिटी आणि प्रवास अनुभव देण्यासाठी समर्पित आहोत, असे ‘फ्लाय ९१’ व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com