जोशी आर्केट सोसायटीत सौर उर्जा पॅनेल

जोशी आर्केट सोसायटीत सौर उर्जा पॅनेल

४३ (टुडे १ साठी)


-rat२p२७.jpg-
२४M८१०५०
रत्नागिरी : जोशी आर्केड गृहनिर्माण संस्थेत बसवण्यात आलेली सौर पॅनेल.
-rat२p२८.jpg-
२४M८१०५१
रत्नागिरी : सौरऊर्जा प्रकल्पासाठी कर्ज प्रकरण मंजूर केल्याबद्दल जोशी आर्केड सोसायटीच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचे आभार मानले.
-------------
जोशी आर्केड सोसायटीत सौरऊर्जा पॅनेल

वीजबचत होणार; अनुदानही मिळाले, वीज विक्रीही करणार

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : अपारंपरिक ऊर्जास्रोत असलेल्या सौरऊर्जेवर रत्नागिरी शहरातील गृहनिर्माण संस्थेने सौरऊर्जा पॅनेल बसवले असून त्या माध्यमातून पार्किंगमधील दिवे झगमगणार आहेत. विविध संस्था, बॅंका, पतसंस्थांसोबत आता गृहनिर्माण संस्थेनेही पुढाकार घेतला आहे. शहरातील वरचीआळी, सुभाषरोड येथील जोशी आर्केड गृहनिर्माण संस्था असे या संस्थेचे नाव आहे.
या गृहनिर्माण सोसायटीत तीन विंग असून जास्त सदनिका आहेत. यामुळे लाईटबिल २५ हजार रुपयांच्या दरम्यान येत होते. खर्च कमी करण्याच्या हेतूने सभेमध्ये चर्चा करून सौरऊर्जा पॅनेल बसवण्याचा पर्याय निवडण्यात आला. याकरिता सोसायटीचे अध्यक्ष अनंत कुलकर्णी, सेक्रेटरी प्रितम शेरे आणि खजिनदार शांताराम देव आणि कार्यकारिणीने पुढाकार घेतला व सौरऊर्जा पॅनेल बसवण्यात आले.
एकूण २४ पॅनल बसवली असून, त्याची क्षमता १३ किलोवॅट आहे. सोलर यंत्रणा ग्रीडमध्ये आहे. सोसायटी लाईट बिल २४ हजार रुपयांच्या दरम्यान येत होते. आता फक्त मीटरभाडेच भरावे लागणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार असून, बिलसुद्धा एवढे भरमसाठ येणार नाही. ग्रो युनिटद्वारे महावितरणला वीज विक्री केली जाते. या सर्व प्रकल्पासाठी एकूण खर्च आठ लाख रुपयांपर्यंत आला आहे. यावर ९४ हजार रुपये अनुदान मिळाले आहे. सौरऊर्जा पॅनेल बसवण्याकरिता अमेय चिंगले आणि मंदार ढेकणे यांचे सहकार्य लाभले.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गाडीतळजवळील शहरशाखेने या प्रकल्पासाठी गृहनिर्माण संस्थेला कर्जपुरवठा केला आहे. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, बँकेचे संचालक, पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्यामुळे रत्नागिरीमधील पहिल्याच गृहनिर्माण संस्थेला कर्ज पुरवठा करण्यात आला. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होत आहे.
----------
कोट
जोशी आर्केड सोसायटीतील सर्व सभासद व कमिटी सदस्यांच्यावतीने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. रत्नागिरीतील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अर्थसाहाय्य घेऊन वीजबचतीसाठी सौरऊर्जा प्रकल्प यंत्रणा बसवावी.

--अनंत कुलकर्णी, अध्यक्ष, जोशी आर्केड गृहनिर्माण संस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com