''अब्दुल कलाम प्रज्ञाशोध''चा निकाल जाहीर

''अब्दुल कलाम प्रज्ञाशोध''चा निकाल जाहीर

swt219.jpg
81083
यशश्री ताम्हणकर, ओम वाळके, दुर्वा प्रभू, जान्हवी पाटील, साक्षी दळवी.

‘अब्दुल कलाम प्रज्ञाशोध’चा निकाल जाहीर
जिल्हास्तरीय परीक्षाः अर्णव भिसे, यशश्री ताम्हणकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत चौथीमधून हरकुळ खुर्द गावडेवाडी शाळेचा अर्णव भिसे हा विद्यार्थी २९६ गुण मिळवून जिल्ह्यात पहिला आला. सातवीमधून मसुरे-देऊळवाडा शाळेची विद्यार्थिनी यशश्री ताम्हणकर हिने २८४ गुण मिळवून जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला. चौथी व सातवीच्या प्रत्येकी पहिल्या दहा विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.
पाचवी व आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध ही ३०० गुणांची परीक्षा घेतली जाते. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील ही परीक्षा १७ मार्चला घेतली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी जाहीर केला आहे. चौथीमधून या परीक्षेला ३९७७ विद्यार्थी बसले होते. यापैकी १६३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सातवीमधून १९४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ६३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या परीक्षेत चौथीच्या जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत अर्णव भिसे (२९६, हरकुळ खुर्द गावडेवाडी), ओम वाळके (२९२, कुडाळ पडतेवाडी), दुर्वा प्रभू (२८६, कुडाळ पडतेवाडी), सानवी गावडे (२८२, बिबवणे नं. १), कैवल्य राऊळ (२८२, माणगाव नं. २), मधुर पेंडूरकर (२८०, पेंडूर खरारे), शमिका देसाई (२८०, कुडाळ पडतेवाडी), पृथ्वीक दळवी (२८०, कुडाळ एमआयडीसी कुंभारवाडा), मनस्वी रेडेकर (२७८, उभादांडा नं. १), ज्ञानदा खुळपे (२७८, एडगाव नं. १) यांनी दहा जणांच्या गुणवत्ता यादीत क्रमांक मिळविले आहेत. तर सातवीच्या जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत यशश्री ताम्हणकर (२८४, मसुरे देऊळवाडा), जान्हवी पाटील (२७६, कुंभवडे), साक्षी दळवी (२६२, वजराट नं. १), दीपाली भणगे (२६०, घोटगेवाडी), वैदेही पाताडे (२५८, पावशी नं. १), चैतन्य गावकर (२५४, सोनुर्ली नं. १), अथर्व पंडित (२५२, कास नं. १), हर्षल पंडित (२५२, कास नं. १), प्राजक्ता भोकरे (२५०, वेंगुर्ले नं. २), वरद बाक्रे (२४६, कणकवली नं. ३) यांनी यश मिळविले आहे.

चौकट
तालुकानिहाय चौथीचे विद्यार्थी
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षेत चौथीमधून देवगड तालुक्यात अनुजा झांबरे (२६२, पुरळ हूर्शी), कपिल कांबळे (२५८, विजयदुर्ग नंबर १,) वेदांत वाडकर (२५८, महाळुंगे राणेवाडी). दोडामार्ग-आराध्या नाईक (२७८, कोनाळ शासकीय वसाहत), रश्मी गवस (२७०, कोनाळ शासकीय वसाहत), दीक्षांत फडके (२६८, पिकुळे नं. १). कणकवली-अर्णव भिसे (२९६, हरकुळ खुर्द गावडेवाडी), सनोबर मुजावर (२७०, असलदे नं. ४), गौरांग वायंगणकर (२५६, बीडवाडी नं १). कुडाळ-ओम वाळके (२९२, पडतेवाडी), दुर्वा प्रभू (२८६, पडतेवाडी), सानवी गावडे (२८२, बिबवणे नं. १). मालवण-मधुर पेंडूरकर (२८०, पेंडूर खरारे), श्रीवर्धन पारकर, (२७४, रेवतळे मालवण), अनन्या पाटील (२५८, पेंडूर नं. १). सावंतवाडी-दुर्वा नाटेकर (२७४, बांदा नं. १), आराध्या परब (२७२, कोलगाव नं. २), स्वरधा झेंडे (२६८, तळवडे नंबर ६). वैभववाडी-ज्ञानदा खुळपे (२७८, एडगाव नं. १), मृणाल सरकटे (२७२, वैभववाडी नबार १, राधा पवार (२७२, खांबाळे मोहितेवाडी). वेंगुर्ले- तालुक्यात मनस्वी रेडेकर (२७८, उभादांडा नं. १), शुभ्रा अंधारी (२६०, वेंगुर्ला नंबर १), रोहन गावडे (२५०, मातोंड बांबर नंबर ५) यांनी तालुकानिहाय प्रथम तीन क्रमांक मिळविले आहेत.

चौकट
तालुकानिहाय सातवीचे विद्यार्थी
सातवीमध्ये तालुकास्तरावर देवगड तालुक्यात क्षिती सावंत (२४०, जामसंडे नं. १), मधुरा ठुकरूल (२३० , इळये नं. १), अपूर्वा गोगटे (२२६, पाटथर). दोडामार्ग-जान्हवी पाटील (२७६, कुंभवडे), दीपाली भणगे (२६० घोटगेवाडी), श्रुती केसरकर (२४२, घोटगेवाडी), कणकवली-वरद बाक्रे (२४६, कणकवली नं. ३), हदिया बडेघर (२३६, हरकुळ बुद्रुक उर्दू), सम्यक पुरळकर (२२२, कणकवली नं. ३). कुडाळ-वैदेही पाताडे (२५८, पावशी नं. १), इशिका चव्हाण (२३०, कसाल नं. १), मिताली म्हाडगुत (२२८, आंबेरी नं १). मालवण-यशश्री ताम्हणकर (२८४, मसुरे देऊळवाडा), मृणाल धुरी (२३८, आचरे पिरावाडी), मानस परब (२२६, हडी नं. १). सावंतवाडी-चैतन्य गावकर (२५४, सोनुर्ली नं. १), अथर्व पंडित (२५२, कास नं. १) हर्षल पंडित (२५२, कास नं. १). वैभववाडी-सई रंबाडे (२३८, केंद्रशाळा हेत), सार्थक खानविलकर (२२४, केंद्रशाळा हेत), आर्य मोरे (२१४, सांगुळवाडी नं. १), वेंगुर्ले-साक्षी दळवी (२६२, वजराठ नं. १), प्राजक्ता भोकरे (२५०, वेंगुर्ले नं. २), मयंक नंदगडकर (२३२, वेंगुर्ला नं. १) अशाप्रकारे तालुकानिहाय प्रथम तीन क्रमांक मिळविले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com