संस्कृत उपकेंद्रात महाराष्ट्र दिन

संस्कृत उपकेंद्रात महाराष्ट्र दिन

३३ (पान २ साठी)

-rat२p१९.jpg-
२४M८१०१०
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात महाराष्ट्रदिनी संचालक डॉ. दिनकर मराठे व सहकारी.
------------
भारतरत्न डॉ. काणे संस्कृत उपकेंद्रात महाराष्ट्र दिन

रत्नागिरी, ता. ३ : महाराष्ट्र राज्याने देशाला सर्वच क्षेत्रात योगदान दिले आहे. येत्या काळात डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन रत्नागिरी उपकेंद्रासोबतच महाराष्ट्र राज्याचीदेखील भरभराट होऊदे, असे प्रतिपादन संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले. ते महाराष्ट्र दिनानिमित्ताने बोलत होते.
शहरातील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात ध्वजवंदन करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. या वेळी संचालक डॉ. मराठे यांनी महाराष्ट्र दिनामागील महत्व आणि इतिहास उलगडला. प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. अक्षय माळी, प्रा. कश्मिरा दळी, समन्वयक स्वरूप काणे, प्रथमेश घोसाळे, निकिता अडखराव, अपर्णा कोकरे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com