व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील

व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील

swt२२८.jpg
८१०९९
कुडाळः अभिजन विचार सभेत बोलताना खासदार विनायक राऊत. यावेळी अमित सामंत, नितीन वाळके, रमण वायंगणकर, संदीप टोपले. (छायाचित्रः अजय सावंत)

व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील
विनायक राऊत ः कुडाळात अभिजन विचार सभा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ः समाजातील जाणकार आणि समाजाला दिशा देणारी तुम्ही मंडळी आहात. तुम्हा सारख्या गुरूजनांचे विकासात्मक मार्गदर्शन माझ्यासाठी अत्यंत मौलिक आहे. जे प्रश्न तुम्ही मांडले ते भविष्यात सोडविण्याच्या निश्चित प्रयत्न करेन. पर्यटनाला शाश्वत आधार देण्याचे ठरविले असून हा जिल्हा आर्थिक उन्नतीकडे नेऊया, असे आवाहन सिंधुदूर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास (इंडिया) चे उमेदवार विनायक राऊत यांनी व्यापारी, उद्योजक, विविध संस्था प्रतिनिधी यांना अभिजन विचार सभेत येथे केले.
श्री. राऊत यांच्या प्रचारार्थ अभिजन विचार सभा आयोजित केली होती. यावेळी अमित सामंत, नितीन वाळके, रमन वायंगणकर व संदीप टोपले उपस्थित होते. जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, विविध संस्था प्रतिनिधींनी समस्या राऊत यांच्यासमोर मांडल्या. यावेळी श्री. राऊत म्हणाले, "जीएसटी संदर्भात अनेक अडचणी समोर येत आहेत. अनेक कर एकत्र करून एकच कर असेल तर सुलभता येईल या भावनेतून हा जीएसटी मंजूर केला. परंतु, या करामुळे या देशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांमध्ये भीक नको पण कुत्र आवर अशी अवस्था झाली आहे. जीएसटीच्या माध्यमातून नोकरराज आणू नका ही आजही मागणी आहे. जीएसटीमुळे अनेक व्यवसाय बंद करावे लागले.
शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये ५०० बेडसह ६ ते ७ ऑपरेशन थिएटर्ससाठी लवकरच इमारत होईल. येथील महिला बाल रुग्णालयाला चालना देण्याचे काम केले. तेथे मंजूर ब्लड बँक व उर्वरित काही सुविधा पूर्ण करणार आहे. दोडामार्ग येथे ५० एकर जागेत एमएमसी हा मेडिकल प्रोजेक्ट मंजूर असून तो पूर्ण करून घेणारच. चक्राकार पद्धतीने शासकीय नोकर भरती विदर्भऐवजी सिंधुदूर्ग जिल्ह्यातून सुरू करण्यास मंजुरी घेतली. परंतु, दुर्दैवाने राज्यातील सरकार गेले आणि त्याला स्थगिती दिली, असेही राऊत म्हणाले.
जुन्या पेन्शनसाठी आम्ही आंदोलन करुन हा विषय संसदेत मांडला आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा देशात रेंगाळलेला एकच महामार्ग आहे. याला जबाबदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा मी नाही तर याची जबाबदारी राज्याने घेतली. शक्तीपीठ हा ठेकेदारांची पोटे भरण्यासाठी आहे. चिपी विमानतळ एमआयडीसी किंवा सरकारने ताब्यात घ्यावा ही आमची मागणी राहणार आहे. जिह्यातील मंजूर कथ लॅब पुन्हा या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही, असेही राऊत म्हणाले. प्रास्ताविक नितीन वाळके यांनी केले. प्रविण शेवडे, संभाजी कांबळे, सतिश लळीत, नितीन तायशेटे, सुनील सौदागर, बाळू राणे, नंदन वेंगुर्लेकर, उमेश गाळवणकर, राजन नाईक, सई लळीत, सुनिल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com