महामार्गावर खासगी बसला आग

महामार्गावर खासगी बसला आग

पान २

गिम्हवणेत जत्रोत्सव उत्साहात
दाभोळ ः गिम्हवणे येथील श्री देव भैरीभवानी मंदिराचा जत्रोत्सव उत्साहात पार पडला. या निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना तालुक्यातील मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री दैव भैरीभवानी मंदिराच्या पदाधिकारी, ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

८०९९४
महामार्गावर खासगी बसला आग
संगमेश्वर ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे येथे रत्नागिरी दिशेला जाणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली. आगीचे कारण समजले नाही; मात्र प्रवासी सुखरूप आहेत. आग लागल्याचे समजल्यानंतर संगमेश्वर पोलिस ठाण्याचे सचिन कामेरकर, प्रशांत शिंदे, आव्हाड आणि कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास मदत केली. कैस मालगुंडकर यांनी म्हात्रे कंपनीचा पाण्याचा टॅंकर तत्काळ पाठवल्याने आग आटोक्यात आली. गाडीचे नुकसान फार झाले नाही.

८०९९६
गोळप, पावस, गावखडीत संचलन
पावस : पूर्णगड पोलिस ठाणे हद्दीतील गोळप व पावस बाजारपेठ आणि गावखडी व पूर्णगड परिसरात रूट मार्च घेण्यात आला. या मार्चसाठी त्रिपुरा राज्य रायफलचे एक डीवायएसपी, एक इन्स्पेक्टर, ५१ जवान आणि पूर्णगड पोलिस ठाण्याचे २ अधिकारी व ९ अंमलदार हजर होते. रूट मार्चवेळी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्यावतीने जनतेला निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. परिसरामध्ये विनापरवाना पोस्टर वगैरे लावू नये जेणेकरून वातावरणामध्ये बदल होईल. जाहीर सभा घ्यायची असेल त्या संदर्भात परवानगी घेण्यात यावी, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच लोकसभा निवडणूक शांततेत पार पडण्याचे आवाहन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com