-राजापुरात २२८ वैयक्तीक विहिरींना मंजुरी

-राजापुरात २२८ वैयक्तीक विहिरींना मंजुरी

४ (पान ५ साठी, अॅंकर)

राजापुरात २२८ वैयक्तीक विहिरींना मंजुरी

२८ विहिरींची कामे सुरू ; रोजगार निर्मितीसह सिंचनामध्ये वाढ
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत वैयक्तीक सिंचन विहिरी उभारण्याला अनुदान देण्यात येत असून त्यातून तालुक्यामध्ये २२८ वैयक्तीक सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी २८ सिंचन विहिरींची कामेही सुरू झाल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली. या विहिरीच्या उभारणीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती आणि त्याच्या जोडीने सिंचनाखालील क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.
लोकांच्या हाताला गावामध्ये काम उपलब्ध करून देत त्या द्वारे त्यांचा आर्थिक स्तर आणि जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही महत्वाकांक्षी योजना शासनातर्फे गेल्या कित्येक वर्षापासून राबवली जात आहे. या योजनेतून सिंचनासह अन्य विविध स्वरूपाची विकासकामे केली जातात. लोकांना रोजगार मिळताना गावोगावाच्या विकासकामांनाही चालना मिळते. रोजगार निर्मिती करताना शेतीला चालना देणे आणि त्या द्वारे सिंचनाखालील क्षेत्र वाढवण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तीक सिंचन उभारणीलाही शासनाकडून सुमारे चार लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे.
शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेची तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यातून, तालुक्यामध्ये तब्बल २२८ सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली असून, त्यांच्या कामाचा शुभारंभ होण्याच्या अनुषंगाने वर्कऑर्डरही देण्यात आल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
------------------
चौकट
चार लाखाचे अनुदान

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत वैयक्तीक सिंचन विहिरीला शासनाकडून ४ लाख रुपयांचे अनुदान मंजूर होते. त्यापैकी अकुशल कामांसाठी २ लाख ७८ हजार ९० रुपये तर कुशल कामांसाठी १ लाख २१ हजार ९१० रुपयांचे अनुदान उपलब्ध होते.
-----------
चौकट
दृष्टिक्षेपात राजापूर

मंजूर झालेल्या विहिरी ः २२८
वर्कऑर्डर दिलेल्या विहिरी ः २२८
काम सुरू असलेल्या विहिरी ः ३०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com