हातीव शाळेत करिअर मार्गदर्शन शिबिर

हातीव शाळेत करिअर मार्गदर्शन शिबिर

पान ५
हातीव शाळेत करिअर मार्गदर्शन शिबिर
संगमेश्वर : हातीव शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर झाले. मुख्याध्यापक सुनील करंबेळे म्हणाले, ‘जायचे कुठे हेच माहिती नसेल तर ध्येयापर्यंत पोचणे कठीण होईल. वेळेचा सदुपयोग करून जीवनात पुढे जाता येईल. प्रा. मिलिंद कडवईकर यांनी करिअर निवडताना कोणती काळजी घ्यावी हे समजावताना छ्त्रपती शिवाजी महाराज, थॉमस अल्वा एडिसन, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सादर केले. बारावीच्या पुढे करिअर करताना कोणत्या सीईटी द्याव्या लागतात, त्यासाठी कशी तयारी करावी लागते हे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला सरपंच नंदकुमार कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन सुतार, विनय होडे आदी उपस्थित होते.

चैत्रपालवी वार्षिक अंकाचे प्रकाशन
साखरपा : चैत्रपालवी वार्षिक अंकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्रदिनी झाला. आठल्ये-पित्रे महाविद्यालयाचे प्रा. अरविंद कुळकर्णी यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कोमसाप देवरूख शाखेच्या साखरपा विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजिला होता. या अंकाचे संपादन पत्रकार अमित पंडित यांनी केले आहे. प्रकाशन सोहळ्यादरम्यान प्रा. कुळकर्णी यांनी साहित्य वाटचालीचा आढावा घेतला. कोमसाप देवरूखचे अध्यक्ष दीपक लिंगायत यांनी चैत्रपालवीच्या पहिल्याच प्रयत्नाचे कौतुक केले. अंकाच्या चित्रकार श्वेता केळकर यांचा प्रा. कुळकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आबासाहेब सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी अंकाचे समीक्षण केले. केंद्रशाळा साखरपा नं. १ चे शिक्षक बाबासाहेब लाड यांनी अंकातील लेखाचे वाचन केले.

राष्ट्रवादीच्या दापोली विधानसभा अध्यक्षपदी कालेकर
दाभोळ ः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या दापोली विधानसभा अध्यक्षपदी रवींद्र कालेकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कालेकर पक्षात कार्यरत असून, ते पेशाने शेतकरी आहेत. दापोली शहरात व तालुक्यात शैक्षणिक कार्यात मोलाचे काम करत आहेत. कालेकर यांनी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम करून जिल्ह्यात सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या १७० च्या वर नेली आहे. मागील पाच वर्ष कोकण विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com