उभादांडा गाव पर्यटन नकाशावर झळकेल

उभादांडा गाव पर्यटन नकाशावर झळकेल

swt231.jpg
81115
उभादांडाः येथे कॉर्नर सभेत उपस्थित शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत करताना कार्मीस आल्मेडा. सोबत महायुतीचे पदाधिकारी.

उभादांडा गाव पर्यटन नकाशावर झळकेल
दीपक केसरकरः नवाबाग येथे कॉर्नर सभा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २३ः उभादांडा गावात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं कवितांच गाव म्हणून स्मारक होत आहे. हे पाहण्यासाठी आगामी काळात अनेक पर्यटक याठिकाणी येतील. याशिवाय इथल्या या गावातील अनेक विकासकामांसाठी, रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. मच्छिमार बांधवांसाठी सिंधूरत्नमधून अनेक योजना दिल्या आहेत. यामुळे आगामी काळात उभादांडा गाव पर्यटनाच्या नकाशावर झळकेल, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उभादांडा येथे केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ केसरकर यांची कॉर्नर सभा आज नवाबाग येथील दादा केळुसकर यांच्या घरी व नंतर उभादांडा येथील मानवेल फर्नांडिस यांच्या घरी झाली. यावेळी केसरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘कोकणी माणूस हा स्वाभिमानी आहे. तो कधी स्वतःचा स्वाभिमान विकत नाही. कोकणची अस्मिता जपण्यासाठी राणे यांना केंद्रात मंत्री म्हणून पाठवणे हा तुमचा बहुमान असेल.’’
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप गिरप, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मनवेल फर्नांडिस, उभादांडा उपसरपंच आल्मेडा, भाजप तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, परबवाडा उपसरपंच पप्पू परब, कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, गणपत केळुसकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवासेना पदाधिकारी सौरभ परब आदी उपस्थित होते. यावेळी याठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रमुख कार्मीस आल्मेडा यांनी उपस्थित राहत केसरकर यांनी चर्च व अन्य विकासकामांसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com