भूमिपुत्रांचे हक्क जपून विकास करणार

भूमिपुत्रांचे हक्क जपून विकास करणार

swt233.jpg
81119
वेंगुर्लेः येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना विनायक राऊत.

भूमिपुत्रांचे हक्क जपून विकास करणार
विनायक राऊतः वेंगुर्ले येथे जाहीर प्रचार सभा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ः बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते यांचा आदर्श घेऊन संसदेत काम केले आहे. त्यामुळे कोणत्याही भूमिपुत्राला उध्वस्त न करता त्या ठिकाणच्या भूमिपुत्रांचा हक्क अबाधित ठेवून कोकणचा विकास करण्याची शपथ मी घेतली असल्याचे इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी येथे केले.
श्री. राऊत यांच्या प्रचारार्थ काल (ता. १) वेंगुर्ले - माणिकचौक येथील (कै.) सी. आर. खानोलकर व्यासपिठावर जाहीर प्रचार सभा झाली. श्री. राऊत म्हणाले, ‘‘कोकण म्हणजे सोन्याची अंडी देणारी भूमी असे भाजपच्या लोकांना वाटत आहे. कोकणभूमी परप्रांतियांच्या घशात घालण्याचे काम भाजप करत आहे. आतातर ग्रामपंचायतीचे अधिकार काढून घेणार आहेत आणि त्याठिकाणी सिडको आणणार आहेत. यात तालुक्यातीलही काही ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दीपक केसरकर यांनी साईबाबांची शपथ घेऊन सांगावे ज्यावेळी हा निर्णय कॅबिनेटमध्ये मंजूर झाला, त्यावेळी तुम्ही गप्प का बसलात0 अशा वेळेला माझ्या कोकणवासीयांच्या भूमीच्या रक्षणासाठी मी, आमदार वैभव नाईक व राजन साळवी यांनी पहिला विरोध या सिडको प्राधिकरणाला केला. कोकणभूमी आमची आहे, आमच्या पूर्वजांची आहे, तिचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. मात्र, ही हडप करण्याचा पाप जर केलात तर आम्ही गप्प बसणार नाही.’’
यावेळी त्यांनी राणे कुटुंबियावर टिका केली. व्यासपिठावर माजी आमदार शंकर कांबळी, शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले-पाटील, राष्ट्रवादी काँग्रसचे नेते माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, अण्णा केसरकर, बाळा गावडे, जान्हवी सावंत, नम्रता कुबल, अर्चना घारे-परब, इर्शाद शेख, साक्षी वंजारी, शैलेश परब, रमण वायंगणकर, बाळा गावडे, विवेक ताम्हणकर, भालचंद्र चिपकर, जयपकाश चमणकर, जगन्नाथ डोंगरे, यशवंत परब, प्रकाश गडेकर, विधाता सावंत, संजय गावडे, अॅड. जी. जी. टांककर, पंकज शिरसाट, सावली पाटकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com