गृह मतदानाबाबत एआरओ, तहसीलदारांनी भेट द्या

गृह मतदानाबाबत एआरओ, तहसीलदारांनी भेट द्या

५० (पान ३ साठी)

-rat२p३३.jpg-
२४M८१११०
रत्नागिरी ः जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह.
---------
गृह मतदानाची तहसीलदारांनी पहाणी करावी

एम. देवेंदर सिंह ः निवडणूक व्यवस्थापन आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः गृह मतदान करताना गोपनीयता राखली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार यांनी भेट देऊन पाहणी करावी, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपर्क व्यवस्थापन तथा जिल्हा निवडणूक व्यवस्थापन योजनाबाबत आज आढावा बैठक झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती‍किरण पुजार, सिंधुदुर्गचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, परिविक्षाधीन आयएएस डॉ. जस्मीन, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारूती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई आदींसह नोडल अधिकारी उपस्थित होते.
क्षेत्रीय स्तरावरून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी सिंह यांनी मतदार चिठ्ठीचे वाटप, वेबकास्टिंग, मतदारयादीवरील पीबी मार्किंग याबाबत विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेतला. ते म्हणाले, सहाय्यक निवडणूक अधिकारी, तहसीलदार यांनी मतदान केंद्रावंरील वेबकास्टिंगबाबत भेट देऊन पाहणी करावी. त्याची रंगीत तालीम पाहावी. झोनल अधिकारी, तलाठी यांची बैठक घेऊन नियोजन तसेच व्यवस्था याबाबत आढावा घ्यावा. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेले आरोग्य नियोजन सर्वांना पाठवण्यात येईल, त्यानुसार कार्यवाही करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com