सेवानिवृत्तांचा स्नेहमेळावा

सेवानिवृत्तांचा स्नेहमेळावा

३४ (पान ५ साठी, संक्षिप्त)


सेवानिवृत्तांचा स्नेहमेळावा

रत्नागिरी ः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रत्नागिरी मंडळातून विविध पदांवर काम करून निवृत्त झालेल्या वर्ग १ ते ४च्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा दुसरा स्नेहमेळावा ११ जूनला रत्नागिरी येथे होणार आहे. यापूर्वी ५ मे २००५ ला सेवानिवृत्तांचा स्नेहमेळावा झाला होता. त्या वेळी सचिवपदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत १२१ सेवानिवृत्त सहभागी झाले होते. आता पुन्हा २० वर्षानंतर असाच स्नेहमेळावा रत्नागिरी येथे होणार आहे. सुभाष थरवळ यांच्या प्रमुख संयोजनाखाली सर्वश्री प्रभाकर रहाटे, शरद कांबळे, विजय जाधव, उदय शिंदे, उदय डाफळे, दिलीप भाटकर, शरद कोतवडेकर, नंदप्रकाश बिर्जे, अविनाश पाटणकर व शिरीष वारंग, संध्या भोसले, स्मिता बंडबे यांची अस्थायी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे.
-----------

रविवारी नृत्यसंध्या कार्यक्रम

रत्नागिरी ः साईश्री नृत्य कला मंदिरतर्फे नृत्यसंध्या हा भरतनाट्यम नृत्याविष्कार ७ मे रोजी मारूती मंदिर येथील वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. साईश्रीच्या विद्यार्थिनी इरा दळी, सुनिधी काणे, स्वरा मुसळे, नॅन्सी एम, सिद्धी केळकर, अनुश्री रसाळ, भार्गवी गोखले, मुग्धा जामखेडकर, गार्गी चिटणीस, आदिती काजरेकर, सानिका लिंगायत, अक्षता काजरेकर, सानवी पाटील या सगळ्या रचना सादर करणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाच नृत्य दिग्दर्शन व संकल्पना गुरू मिताली भिडे यांची आहे. गेली दहा-बारा वर्षे नृत्यसंध्या कार्यक्रमातून साईश्रीतर्फे केले जात आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. सर्वांनी त्या दिवशी मतदान करून संध्याकाळी या कार्यक्रमाला हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------

कामथे विद्यालयात महाराष्ट्र दिन

चिपळूण : कामथे येथील बाळासाहेब माटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय माटे, सचिव विद्या माटे, संचालक कुंदन माटे, मुख्याध्यापक चाँदसाहेब मुल्ला यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. प्रशालेच्या प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप डॉ. माटे व सचिव माटे यांनी केले. अध्यक्ष डॉ. विजय माटे यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
------

स्वामी समर्थांच्या
पालखीचे स्वागत
चिपळूण : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि गुरूमाऊली सद्गुरू श्री दासदिगंबर महाराज यांच्या आशीर्वादाने प्रदीप काशिनाथ गगनग्रास यांच्या मार्कंडी येथील निवासस्थानी श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे मोठ्या भक्तीमय वातावरणात आगमन झाले. या वेळी स्वामीभक्तांनी वाजतगाजत, गीतगायन करून पालखीचे स्वागत केले. या वेळी दर्शनासाठी रिघ लागली होती. प्रथमतः स्वामींच्या पालखीला आरती करून गगनग्रास यांच्या निवासस्थानी पालखी विराजमान झाली. यानंतर चिपळूण आणि परिसरातील स्वामीभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. या वेळी आरती तसेच स्वामीमंत्राचा जप करण्यात आला. दुपारच्या वेळी स्वामींच्या पालखीला महाप्रसाद अर्पण करून स्वामीभक्तांनी देखील महाप्रसादाचा लाभ घेतला. यानंतर पालखी सायंकाळच्या वेळी खेड तालुक्यातील पिरलोटे या ठिकाणी मार्गस्थ झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com