बांदेश्वर कलशारोहणाचा रविवारी वर्धापन दिन

बांदेश्वर कलशारोहणाचा रविवारी वर्धापन दिन

swt236.jpg
81131
श्री देव बांदेश्वर मंदिर कळस.

बांदेश्वर कलशारोहणाचा
रविवारी वर्धापन दिन
बांदाः येथील जागृत असलेल्या श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहणाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. ५) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ८ वाजता गणपती पूजन, देवतांना नारळ, विडे अर्पण करून सामुदायिक गाऱ्हाणे, ८.३० वाजता श्री देव बांदेश्वर मंदिरात रुद्र अभिषेक अनुष्ठान, श्री देवी भूमिका मंदिरात श्री सूक्त आवृत्ती अनुष्ठान, श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवृत्ती जप अनुष्ठान, दुपारी १.३० वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता स्थानिक मंडळाची भजने, रात्री ७ वाजता युवा कीर्तनकार आर्या साळगावकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, रात्री ९ वाजता पालखी सोहळा होणार आहे. ज्या भक्तगणांना महाप्रसादासाठी वस्तुरूप देणगी द्यायची असेल, त्यांनी मंदिराच्या कार्यालयात आणून द्यावी. रविवारी दिवसभर धार्मिक कार्यक्रम असल्याने यादिवशी इतर कोणतीही वैयक्तिक स्वरुपाचे धार्मिक विधी केले जाणार नाहीत. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव बांदेश्वर भूमिका देवस्थानच्यावतीने केले आहे.
...........
डिंगणे येथे आज
''शिवसंग्राम'' नाटक
बांदाः माहेरवाशिणींचा देव म्हणून ख्याती असलेल्या डिंगणे येथील श्री देव पुरमार वर्धापन दिनानिमित्त उद्या (ता. ३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता श्रींची महापूजा व आरती, दुपारी तीर्थप्रसाद, महाप्रसाद व सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता सिद्धिविनायक दशावतार नाट्यमंडळ पिकुळे यांचा ''शिवसंग्राम'' हा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन डिंगणे ग्रामस्थ व मानकरी यांनी केले आहे.
............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com