देवडेच्या आकांक्षांची सुवर्णमय भरारी

देवडेच्या आकांक्षांची सुवर्णमय भरारी

५२ (पान ३ साठी, अॅंकर)


-rat२p३५.jpg-
P२४M८११३९
आकांक्षा कदम
----------
देवडेच्या आकांक्षांची सुवर्णमय भरारी

आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धा ; राज्यातील एकमेव खेळाडू
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ३ ः मालदिव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत देवडे येथील आकांक्षा कदम हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दोन सुवर्ण व एक कास्य अशी तीन पदके मिळाली आहेत.
मालदीव देशामध्ये ६वी एशियन कॅरम चॅम्पियन २०२४ या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतीय संघही सहभागी झाला होता. महिलांच्या चारजणींच्या चमूत देवडे गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा उदय कदम हिची संघात निवड झाली. महाराष्ट्रातून फक्त आकांक्षा ही एकमेव व वयाने सर्वात लहान खेळाडू होती. आकांक्षाने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत दोन सुवर्ण व एक कास्यपदक अशी तीन पदके मिळवली. ती अगदी कमी वयात संपूर्ण देशभरात नावाजलेली खेळाडू असून, तिने यापूर्वीही उंच उंच शिखरे चढून यश प्राप्त केले आहे. तिने २०१९ मध्येही मालदीव देशामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी पदार्पणातच दोन सुवर्णपदके मिळवून विक्रम केला होता. तिने राज्यस्तरावरील ओपन गटाचे तब्बल नऊवेळेस विजेतेपद व तीनवेळेस उपविजेतेपद मिळवले आहे. तिला महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अरूण केदार, यतीन ठाकूर, भारती नारायण, रत्नागिरी कॅरम असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, संदीप देवरूखकर, महेश देवरूखकर, भाऊ यश कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com