शेंडी पागण्यावरून एकावर चाकूहल्ला

शेंडी पागण्यावरून एकावर चाकूहल्ला

शेंडी पागण्यावरून
एकावर चाकूहल्ला
सर्जेकोटची घटनाः संशयितावर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २ : शेंडी पागण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर चाकूहल्ला करण्यात आला. यात संतोष सत्यवान शेलटकर (वय ४३, रा. कोळंब, खालचीवाडी) हा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास सर्जेकोट जेटी येथे घडली. याप्रकरणी शेलटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हर्षल रवींद्र पराडकर (रा. सर्जेकोट) याच्याविरोधात येथील पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
संतोष शेलटकर व त्यांचा मित्र जगन्नाथ अंकुश सावजी हे बुधवारी रात्री १० वाजता सर्जेकोट जेटीवर आले होते. यावेळी संशयित हर्षल पराडकर याने शेंडी पागण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून सत्यवान यांना मारहाण केली. यावेळी झालेल्या वादात हर्षल याने आपल्या पॅन्टच्या खिशातील चाकू काढून शेलटकर यांच्या दंडावर, छातीवर व गालावर वार केले. या शेलटकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी हेमंत पेडणेकर करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com