वाहतुकीची कोंडी

वाहतुकीची कोंडी

- rat२p३७.jpg, rat२p३८.jpg-
OP२४M८११४१, P२४M८११४२
संगमेश्वर ः संगमेश्वरात महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी.
------------
सोनवी, शास्त्री पूलावर वाहतूक कोंडी

संगमेश्वर महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी ; दोन किमी वाहनांच्या रांगा, वाहनचालक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३ ः कोकणात चाकरमान्यांचे आगमन सुरू झाले असून एसटी, खासगी बसेस आणि मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. संगमेश्वर येथील सोनवी आणि शास्त्री पूलावर वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या दोन किमी लांब वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे डायव्हर्शन, अरुंद रस्ते, खड्डे अशा समस्यांना सामोरे जात वाहने हाकावी लागत आहेत. उन्हाळी सुट्ट्या चालू झाल्यामुळे चाकरमानी कोकणाकडे वळू लागलेले आहेत. तसेच निवडणुकांचा माहोल असल्यामुळे परजिल्ह्यातील लोकांचाही राबता वाढलेला आहे. खासगी वाहनांची कोकणातील संख्या वाढत आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे महामार्गावर खड्डे वाढले असल्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. तसेच प्रवासाचे तासही वाढले आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे कोकणात वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातून लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावाकडे परतत आहेत. जादा एसटी बसेस, खासगी बसेस आणि खासगी वाहने यामधून चाकरमानी गावात येण्यास सुरुवात झाला आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या पहायल्या मिळत आहेत. चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी पूर्ण झाल्याने रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले असले, तरीही त्यासाठी बायपास केलेले रस्ते आणि जुन्या रस्त्यावरील प्रचंड खड्डे यामुळे वाहतुकीला अडचणी येत आहेत. प्रवासाला दोन ते तीन तास अधिक लागत आहेत. मुंबईतून संगमेश्वरला येण्यासाठी सध्या ९ तासांचा कालावधी लागत असल्याचे वाहनचालकांचे मत आहे. संगमेश्वर जवळील शास्त्रीपुलापासून संगमेश्वर बसस्थानक दोन किमीचे अंतर गाठायला जास्त वेळ लागते. सोनवी पूलावरुन दुहेरी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
------
वाहनांच्या संख्येत भर
मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे अरुंद रस्ते, खड्डे अशा समस्यांना सामोरे जात वाहने हाकावी लागत आहेत. उन्हाळी सुट्ट्या चालू झाल्यामुळे चाकरमानी कोकणाकडे वळू लागलेले आहेत. त्यामध्ये निवडणुकांचा माहोल असल्यामुळे खासगी वाहनांची कोकणातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com