गृह मतदान प्रक्रियेस वेंगुर्ले तालुक्यात प्रारंभ

गृह मतदान प्रक्रियेस वेंगुर्ले तालुक्यात प्रारंभ

swt31.jpg
81208
मातोंड ः येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक हरिश्चंद्र वैद्य यांनी गृह मतदान केले.

गृह मतदान प्रक्रियेस
वेंगुर्ले तालुक्यात प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर ८५ वर्षावरील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि दिव्यांगांसाठी १ मेपासून गावागावात गृह मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. तालुक्यातील मातोंड गावात ७ ग्रामस्थ व एका दिव्यांग व्यक्तीचे गृह मतदान करण्यात आले.
या मतदान प्रक्रिया पथकात दोन मतदान अधिकारी, मायक्रो ऑब्झर्वेशन, स्थानिक ग्रामविकास अधिकारी, तलाठी, कर्मचारी, छायाचित्रकार आणि पोलीस यांचा समावेश आहे. यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अशा पद्धतीचे टपाली मतदान बिहार राज्यात घेतले होते. ज्येष्ठ ग्रामस्थ आणि दिव्यांगांच्या घरी जाऊन हे टपाली मतदान घेण्यात येत आहे. इतर निवडणुकीतील नियमाप्रमाणे आणि गुप्त पद्धतीने हे मतदान घेण्यात येत आहे. तालुक्यातील मातोंड गावातील २७०/६९ या केंद्रावरील ८५ वर्षावरील रुक्मिणी गोविंद घाडी, शैलजा लक्ष्मण वैद्य, रुक्मिणी विश्राम मातोंडकर, रुक्मिणी विष्णू रेडकर, हरिश्चंद्र सखाराम वैद्य या ग्रामस्थांचे तर दिव्यांग स्वप्नाली सुधाकर परब यांचे गृह मतदान घेण्यात आले. मातोंड २७०/७१ या केंद्रावरील सीताबाई सीताराम कोंडुसकर, प्रभावती सखाराम परब यांचे मतदान घेण्यात आले. यावेळी निवडणुक अधिकाऱ्यांसाहित मातोंड ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद इंगळे, तलाठी किरण गजनीकर, कोतवाल विश्राम शेटकर, ग्रामपंचायत कर्मचारी अरुण रेकडर, दिगंबर मातोंडकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com