ठाकरे शिवसेनेतर्फे मालवणात रॅली

ठाकरे शिवसेनेतर्फे मालवणात रॅली

swt33.jpg
81210
मालवणः शहरात ठाकरे शिवसेनेच्यावतीने रॅली काढण्यात आली.

ठाकरे शिवसेनेतर्फे
मालवणात रॅली
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ः विविध घोषणाबाजी करत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शहरातून भव्य फेरी काढण्यात आली. ठाकरे शिवसेनेच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारीही रॅलीत सहभागी झाले होते.
येथील ठाकरे शिवसेना शाखा येथून या रॅलीला सुरुवात झाली. शाखेकडून भरड नाका येथून बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळपार येथे या रॅलीची समाप्ती झाली. या रॅलीत श्री. राऊत व आमदार नाईक यांनी मशाल हाती घेत जनतेला अभिवादन करत मार्गक्रमणा केली. या रॅली दरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
रॅलीत ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवतीसेना जिल्हा विस्तारक रुची राऊत, नितीन वाळके, महेश जावकर, मंदार केणी, भाई कासवकर, सेजल परब, दीपा शिंदे, आकांक्षा शिरपूटे, पूनम चव्हाण, निनाक्षी शिंदे, तृप्ती मयेकर, नरेश हुले, तपस्वी मयेकर, मनोज मोंडकर, मंदार ओरसकर, राष्ट्रीय काँग्रेसचे साईनाथ चव्हाण, बाळू अंधारी, जेम्स फर्नांडिस यांसह तालुक्यातील ठाकरे शिवसेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com