मत-गंमत

मत-गंमत

२१ (निवडणूक पानासाठी)

मत-गंमत-------लोगो

सारी दुनिया उलटीपुलटी....

निवडणुकीच्या कालावधीत गावाच्या पारावर प्रचारसभा चालू होती. उन्हाचा कहर असल्यामुळे कार्यकर्त्यांनी सभा सायंकाळी सहा वाजता घेतली होती. परिसरात फक्त बांबू उभा करून एक लाईट जोडण्यात आला होता. गावातील गावकरी नेत्याच्या भाषणासाठी पाच वाजल्यापासून हजर झाले होते. बुजुर्ग, युवापिढी मंडळी आपापल्या मित्रमंडळीसह पारावरच्या मैदानात हजर झाली. कोणकुणास ठावूक गावात एक भिकारी आला होता. जमलेल्या मंडळींना पाहून तोही या पारावर आला आणि एका कोपऱ्यात बसून होता. नेते-कार्यकर्ते आले सर्वांचे स्वागत झाले. भाषणाला सुरवात केली. कार्यकर्त्यांनी नेत्यांचा परिचय करून दिला. गावातील मंडळीं फक्त माना डोलवत होते. तिथे असलेल्या एका भीक मागणाऱ्याला काहीच कळत नव्हते. हा प्रकार काय चालला आहे म्हणून जरा पुढे गेला. त्यावर काही मंडळींनी त्याला हटकलं. तो बिचारा वादविवाद होऊ नये म्हणून पुन्हा त्या जागेवर जाऊन बसला; पण लक्ष मात्र त्या मंडळींकडेच होते. प्रचारसभेत नेत्यांचे भाषण सुरू असतानाच अचानक लाईट गेला. ग्रामीण भागात केव्हाही लाईट जातो याची सगळ्यांना कल्पना होती. त्यामुळे सभेतील मंडळी स्तब्ध झाली. कार्यकर्त्यांनी लाईट सुरू करण्याचा प्रयत्न केला; पण बल्बच गेला होता. त्यामुळे पारावर लावलेल्या खांबावर चढण्यासाठी शिडीपण नव्हती. शेजारी कचऱ्यात हापूस आंब्याचे लाकडी पट्ट्याचे खोके होते. गणप्या म्हणाला, चला हे खोके उचलून आणूया; पण जाणार कसे? कारण, तिथे भिकारी एका खोक्यावर बसून होता. गणप्या, त्याचे मित्र भिकाऱ्यापर्यंत पोचले. त्यांनी त्या भिकाऱ्याकडे खोके मागितले. त्या वेळी तो काही बोलला नाही. गणप्या आणि त्याच्या मित्रांनी सात-आठ खोके उचलले आणि निघणार त्याच वेळी तो भिकारी म्हणाला, या खोक्यापाई सारी दुनिया उलटीपुलटी होतेय. या खोक्यापासून दूर राहा. मित्र-भाऊ, नातेवाईक यांच्यामध्ये खोका महत्वाचा आहे. लळा, जिव्हाळा शब्द खोटे.. माझी माता, माई.. कुणी कुणाचे नाही, राजा कुणी कुणाचे नाही.. असे म्हणत भिकारी दिसेनासा झाला. गणप्या आणि त्याचे मित्र त्याच्याकडे बघतच राहिले..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com