अक्षय्य तृतीयानिमित्त कुडाळात ''टाटा तनिष्क''तर्फे आकर्षक सूट

अक्षय्य तृतीयानिमित्त कुडाळात ''टाटा तनिष्क''तर्फे आकर्षक सूट

अक्षय्य तृतीयानिमित्त कुडाळात
''टाटा तनिष्क''तर्फे आकर्षक सूट
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः अक्षय्य तृतीया दिनाचे औचित्य साधून टाटा तनिष्कने सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. २ ते १२ मे पर्यंत चालणाऱ्या या ऑफरमध्ये ग्राहकांना सोन्याच्या आणि हिरेजडीत दागिन्यांवर मोठी सूट मिळेल, असे टाटा तनिष्क कुडाळचे संचालक जयंत भाटिया यांनी सांगितले.
या ऑफरमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १० ते २० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. हिरेजडीत दागिन्यांवर खरेदीच्या रकमेवर ५ ते २० टक्केपर्यंत सूट देण्यात येणार आहे. टाटा तनिष्कच्या प्रत्येक दागिन्यासोबत ग्राहकांना शुद्धतेचे प्रमाणपत्र दिले जाते. ग्राहकांना जुन्या सोन्याचे दागिने बदलवून नवीन दागिने खरेदी करून आणखी बचत करता येऊ शकेल. टाटा तनिष्कमध्ये १०० हून अधिक मंगळसुत्रांचे प्रकार ५०० हून अधिक बॅगल्सचे प्रकार, तोडे, हार आणि इतर अनेक दागिने उपलब्ध आहेत. २४ कॅरेट सोन्यातील पाटली, बिल्वर आणि पोहेहारही उपलब्ध आहेत. लक्ष्मीहार, पुतळीहार, अंगठ्या, कर्णफुले, नेकलेस आणि नेकनेल सेट सारख्या विविध दागिन्यांचे नमूनेही टाटा तनिष्कमध्ये उपलब्ध आहेत. सुलभ खरेदीसाठी टाटा तनिष्क भिशीमध्येही गुंतवणूक करता येईल. टाटा तनिष्कची अक्षय्य तृतीया ऑफर ही सोन्याचे आणि हिरेजडीत दागिने खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी टाटा तनिष्कच्या जवळच्या स्टोअरला भेट देऊ शकता किंवा त्यांच्या वेबसाईटला भेट देता येईल, असे श्री. भाटिया यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com