मडूरेत उद्यापासून सत्संग सप्ताह

मडूरेत उद्यापासून सत्संग सप्ताह

82665
श्री गणपतराव महाराज


मडुरेत आजपासून सत्संग सप्ताह

श्री समर्थ सद्गुरु गणपतराव महाराज भक्तमंडळीतर्फे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ः श्री समर्थ सद्गुरु गणपतराव महाराज भक्त मंडळींतर्फे मडुरा-बाबरवाडी येथील प्रेमकुटीर आश्रमात ११ ते १३ मे दरम्यान वार्षिकोत्सव सत्संग सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
होणारे कार्यक्रम असेः शनिवारी (ता.११) पहाटे ५.३० वाजता काकड आरती, ध्यान, १० वाजता प्रतिमा पूजन, १०.३० वाजता ज्ञानाने प्राप्त झालेली अलिप्त स्थितीने व्यवहार कसा करावा या विषयावर चर्चासत्र होईल. ११.३० दासबोध ग्रंथ वाचन व सुलभ आत्मज्ञान ग्रंथ वाचन आणि मान्यवरांची प्रवचने होतील. त्यानंतर भजन व महाप्रसाद होईल. सायंकाळी ५.३० ला ज्ञानाने प्राप्त झालेला अलिप्त स्थितीने व्यवहार कसा करावा यावर चर्चासत्र, ७ वाजता सुलभ आत्मज्ञान ग्रंथ वाचन, मान्यवरांची प्रवचने, भजन व महाप्रसाद. रविवारी (ता.१२) पहाटे ५.३० वाजता काकड आरती, ध्यान, १० वाजता प्रतिमा पूजन, १०.३० वाजता चर्चासत्र, ११.३० वाजता दासबोध ग्रंथ वाचन व सुलभ आत्मज्ञान ग्रंथ वाचन, मान्यवरांची प्रवचने व महाप्रसाद होईल. सायंकाळी ४.३० वाजता मडूरा तिठा ते प्रेम कुटीर आश्रम दरम्यान श्री सद्गुरूंची पालखी मिरवणूक, ७ वाजता सुलभ आत्मज्ञान ग्रंथ वाचन, मान्यवरांची प्रवचने,  रात्री ९.३० वाजता भजन व महाप्रसाद होईल. सोमवारी (ता.१३) पहाटे ५.३० वाजता काकड आरती, १० वाजता प्रतिमा पूजन, १०.३० वाजता दासबोध ग्रंथ वाचन व सुलभ आत्मज्ञान ग्रंथ वाचन व मान्यवरांची प्रवचने होतील. दुपारी भजन, महाप्रसादाचे सप्ताह सोहळ्याची सांगता होईल. सायंकाळी ७ वाजता सत्संग होईल. सर्व साधक, सद्भक्त मंडळी व समस्त नागरिकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सदभक्त मंडळींकडून केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com