कुंभार्ली घाटाचा राजा सिद्धेश पाटील ठरला मानकरी

कुंभार्ली घाटाचा राजा सिद्धेश पाटील ठरला मानकरी

१६ (टूडे २ साठी, सेकंड मेन)
-----------

- rat१०p२.jpg -
२४M८२७०७
चिपळूण येथे आयोजित कुंभार्ली घाटाचा राजा सायकल स्पर्धेतील विजेते .

कुंभार्ली घाटाचा राजाचा सिद्धेश मानकरी

चिपळूण सायकलिंग क्लब ; ३२० सायकलपटू सहभागी

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : चिपळूण सायकलिंग क्लब आयोजित कुंभार्ली घाटाचा राजा पर्व तिसरे या राष्ट्रीय सायकल स्पर्धेत पुरुष खुल्या गटात कोल्हापूरचा सिद्धेश पाटील याने १२ किलोमीटरचा कुंभार्ली घाट फक्त ३६ मिनिटे ४ सेकंदमध्ये सर केला. स्पर्धेच्या २९ किलोमीटर अंतरासाठी त्याला १ तास २ मिनिटे ४१ सेकंद एवढा वेळ लागला. तो कुंभार्ली घाटाचा राजा किताबाचा मानकरी ठरला. गेली दोन वर्षे या स्पर्धेत तो सतत दुसऱ्या स्थानावर राहत होता; मात्र यंदा त्याने हा किताब नावे केला.
या स्पर्धेत ३२० सायकलपटू सहभागी झाले होते. वीसहून अधिक राष्ट्रीय, ४ आंतरराष्ट्रीय तर २५ हून अधिक राज्यस्तरावरील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सायकलिंगमधील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या ३ खेळाडूंचादेखील यात समावेश होता. ही स्पर्धा ५ श्रेणीमध्ये विभागली गेली होती.
पुरुष खुला गट - सिद्धेश पाटील (कोल्हापूर), चिन्मय केवलरामानी (गोवा), सूर्या थातू (पुणे), तेजस धांदे (नागपूर), जिम हॅन्डर्सन (इंग्लंड). पुरुष मास्टर (३६-५० वयोगट) - विनायक गांवकर (गोवा), अल्बिनो अल्बुकर्क (गोवा), अनुप पवार (मुंबई), अर्जुन पाटील (मिरज), सतीश सावंत (पुणे). पुरुष -सीनियर (५१+ वयोगट) प्रशांत तिडके (पुणे ), रिचर्ड म्युलर (जर्मनी), संतोष पवार (पुणे ), संजय सातपुते (पुणे), मरियान डिसुझा (गोवा). पुरुष -लहान मुले ः साईराज भोईटे (सातारा), आर्यन जाधव (पलूस), राजवर्धन शिंदे (विटा), सुजल ओतारी (कोल्हापूर), करण बाळ खाडे (सातारा). महिला -खुला गट ः योगेश्वरी कदम (सांगली), साक्षी पाटील (सांगली), नेहा टिकम (पुणे), जुई नारकर (मुंबई), श्रावणी परीट (चिंचवड).
या स्पर्धेत विट्याच्या ७ वर्षीय शिवतेज वांगणेकर याने राजू मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभार्ली घाट सर करून सर्वात लहान रायडरची नोंद केली तर मुंबईच्या आर्यन कुलवडे (वय १०) याने न थांबता सलग सायकल चालवत कुंभार्ली घाट सर केला. ७७ वर्षीय निरूपमाताई भावे व ७२ वर्षाचे गजानन भातडे यांनी देखील कुंभार्ली घाट या वयात सर केला. या सर्वांना चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com