वेळेवर कर भरणाऱ्या ५०० नागरिकांना आभार पत्र

वेळेवर कर भरणाऱ्या ५०० नागरिकांना आभार पत्र

२ (टूडे १ साठी)

वेळेत कर भरणाऱ्या आभार पत्र

चिपळूण पालिकेचा उपक्रम; १३ कोटी ६८ लाखांची वसुली

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच चिपळूण पालिका प्रशासन कामाला लागले आहे. वेळेवर कर भरणाऱ्या शहरातील पाचशेहून अधिक नागरिकांना पालिकेने आभाराचे पत्र पाठवले आहे. नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे, अशी माहिती पालिकेचे कर वसुली अधिकारी सतीश दंडवते यांनी दिली.

मार्चअखेर कर वसुलीचे मोठे आव्हान पालिकेसमोर असते. शहरातील नागरिकांना पालिकेकडून वेळेवर कर भरण्यासाठी आवाहन केले जाते. तसेच वेळेवर बिलही पाठवली जातात; परंतु नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. यावर्षी कर वसुलीसाठी मुख्याधिकारी विशाल भोसले स्वतः शहरात फिरल्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. यावर्षी पाणी व मालमत्तांसह अन्य करातून १३ कोटी ६८ लाख ४२ हजार ४७८ रुपयांची वसुली झाली आहे. पालिकेला चालू वर्षी मालमत्ता करातून १३ कोटी ३६ लाख ८८ हजार १८३ रुपये तर पाणीपट्टी करातून १ कोटी ७२ लाख ३९ हजार ८५० रुपये असा १५ कोटी ९ लाख २८ हजार ३३ रुपये इतका कर अपेक्षित होता. त्यामुळे वसुलीसाठी मुख्याधिकारी भोसले, उपमुख्याधिकारी तथा कर अधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक अनंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ पथके तैनात करण्यात आली होती. त्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मिळून मालमत्ता कराची १२ कोटी ३७ लाख ६ हजार ५०१ रुपये तर पाणीपट्टीची १ कोटी ३१ लाख ३५ हजार ९७७ रुपयांची वसुली केली आहे. त्यामुळे मालमत्तेची ९२.५३ टक्के तर पाणीपट्टीची ७६.१९ टक्के वसुली झाली आहे.
गतवर्षीपेक्षा यावर्षी ही वसुली वाढली आहे. कर वसुलीसाठी पालिकेचे कर्मचारी नागरिकांना फोन करून घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी आग्रह करत होते. ज्यांनी वेळेवर कर भरला अशा लोकांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले जाईल, असे मुख्याधिकारी भोसले यांनी यापूर्वी जाहीर केले होते. लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर आता नागरिकांना आभाराचे पत्र येण्यास सुरवात झाली आहे.
...................
कोट

दरवर्षी वेळेत कर भरत असल्यामुळे पालिकेने आभाराचे पत्र पाठवले आहे. हा उपक्रम खूपच चांगला. यामधून जे चांगले काम करत आहेत त्या नागरिकांना प्रोत्साहन मिळेल.

- शिरीष काटकर, नागरिक चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com