वर्धापन दिन

वर्धापन दिन

12 (टूडे ३ साठी, संक्षिप्त)

श्री देवी काळकाई मंदिराचा
उद्या वर्धापन दिन

खेड ः भरणे येथील श्री देवी काळकाई मंदिराचा तृतीय वर्धापनदिन १२ मे रोजी होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी ९ वा. देवीची मिरवणूक, रिंगण कार्यक्रम, श्री सत्यनारायण पूजा, दुपारी १२ वा. देवीची आरती, १२.३० ते ३ महाप्रसाद, सायं. ६.३० वा. महाआरती, ७.३० वा. हरिपाठ, रात्री ९ वा. मनोरंजनात्मक कार्यक्रम श्रीराम नमन नाट्यमंडळ (कामथे, हुमणेवाडी, ता. चिपळूण) वगनाट्य तळपता सूर्य साक्षीला अर्थात चाहूल लागली वाघदरीच्या जखमी वाघाला आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.
-------
खेड सायकलिंग क्लबची
मंदिर परिसरात स्वच्छता

पावस ः खेड तालुक्यातील खेड सायकलिंग क्लबने आंबये ग्रामदेवता मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून कचरा संकलन केले. या मोहिमेत सायकलिंग क्लबच्या सदस्यांसह पर्यावरणप्रेमी नागरिकांनी १० पोती प्लास्टिक कचरा जमा करत चिपळूण येथील सह्याद्री निसर्गमित्र संघाकडे वर्गीकरण व प्रक्रियेसाठी सुपूर्द केला. दोन दिवसांपूर्वी सायकलिंग क्लबने मुरडे येथे राममंदिर व खेमनाथ मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली होती. त्या पाठोपाठ आंबये येथील ग्रामदेवता मंदिर परिसरातही स्वच्छतामोहीम राबवली. तेथील ग्रामदेवता मंदिराची वार्षिक जत्रा नुकतीच पार पडली होती. या पार्श्वभूमीवर सायकलिंग क्लबने स्वच्छतामोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. परिसरातून १० पोती प्लास्टिक कचरा संकलन करत परिसर स्वच्छ केला.
----------

मंडणगडच्या खेळाडूंचे
तायक्वांदो स्पर्धेत यश

पावस ः राज्यस्तरीय ओपन स्टेट तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत मंडणगड तालुका तायक्वांदो ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यशस्वी खेळाडूंमध्ये सबज्युनिअर मुले गटामध्ये प्रशिक मर्चंडे (एक सुवर्ण व एक रौप्य), कॅडेड मुली गटामध्ये वेदिका वाळूंज (रौप्य), ज्युनिअर मुले गटामध्ये आयुष दळवी (कास्य), सीनियर पुमसे मुले गटामध्ये प्रणव जाधव (सुवर्ण), तायक्वांदो क्योरूगी प्रकारात साहिल म्हाप्रळकर (कास्य), हर्ष गोवळे (कास्य) यांचा समावेश आहे. या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडियाचे सहसचिव मिलिंद पठारे, महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगाजे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशनचे सचिव लक्ष्मण कररा आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com