कोकण पदवीधरची उमेदवारी मंदार शिरसाट यांना द्यावी

कोकण पदवीधरची उमेदवारी
मंदार शिरसाट यांना द्यावी

82756
मंदार शिरसाट

कोकण पदवीधरची उमेदवारी
मंदार शिरसाट यांना द्यावी

सिंधुदुर्ग युवासेनेचे वरिष्ठांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः युवासेना कोकण सचिव मंदार शिरसाट यांना कोकण पदवीधरची उमेदवारी मिळावी, अशी मागणी सिंधुदुर्ग युवासेनेने केली आहे.
याबाबत त्यांनी तसेच प्रसिद्धी पत्रक दिले आहे. पत्रकात म्हटले आहे की, मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पदवीधर नोंदणी निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर नोंदणी सुरू केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली डी.एड.च्या बेरोजगारांसाठी केलेल्या आंदोलनाची दखल महाराष्ट्राने घेतली आहे. प्रसंगी गुन्हेही दाखल झाले. अनेकवेळा तरुणांचे प्रश्न हाताळून त्यांना न्याय दिला आहे. शिरसाट यांनी कुडाळ शहराचा कारभार उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष म्हणून उत्तमरित्या सांभाळला आहे. युवासेना सिंधुदुर्गच्या वतीने त्यांना कोकण पदवीधरची उमेदवारी मिळावी, अशी मागणी पक्षाकडे करण्यात येणार आहे. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोस्कर, युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, सावंतवाडी तालुकाप्रमुख कौस्तुभ गावडे, वेंगुर्ले तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, मदन राणे (दोडामार्ग), मालवण तालुकाप्रमुख मंदार गावडे, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरोसकर, युवासेना कुडाळ शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, कुडाळ शहर समन्वयक अमित राणे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com