सिंधुदुर्गचे तायक्वांदोपटू चमकले

सिंधुदुर्गचे तायक्वांदोपटू चमकले

82764
रत्नागिरी : तेथे झालेल्या खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तायक्वांदो पटूंनी यश मिळविले.


सिंधुदुर्गचे तायक्वांदोपटू चमकले

रत्नागिरीची स्पर्धा ः ४ सुवर्ण, १ रौप्य, १० ‘कांस्य’ची कमाई

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.१० : रत्नागिरी येथे झालेल्या खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तायक्वांदोपटूंनी
विविध वजनी गटात चार सुवर्ण, एक रौप्य आणि दहा कांस्य पदकांची कमाई केली.
रत्‍नागिरी तायक्‍वांदो आणि राज्‍य तायक्‍वांदो असोसिएशन यांच्या संयुुक्‍तपणे एमआयडीसी मिरजोळे येथे ही स्पर्धा झाली. यात राज्‍यातील ७०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत स्विझल डिसुझा, स्पृहा राणे, देवश्री कणसे आणि दुर्वा पवार यांनी सुवर्णपदक पटकावले. तर साईराज पाटील याने रौप्य पदक पटकावले. तर कास्यपदक मिळविलेल्‍या खेळाडूंमध्ये गणराज शिरवलकर, मंजिरी सावंत, अवनी घाडीगावकर, अस्मी राऊळ, श्रेयस पुजारे, ऋणमय शिरवलकर, रुतुजा शिरवलकर (कांस्यपदक), दुर्वा गावडे, रुजुता कुंभार, साईराज सावंत यांचा समावेश आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव भालचंद्र कुलकर्णी, कणकवली तालुका हौशी तायक्वांदो असोसिएशनचे सचिव एकनाथ धनवटे, प्रशिक्षक मंदार परब, अविराज खांडेकर, दिक्षा पारकर,पंच अंकुर जाधव, जान्हवी बाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com