गंगातीर्थक्षेत्राकडे जाणार्‍या रस्त्यावर खड्डे

गंगातीर्थक्षेत्राकडे जाणार्‍या रस्त्यावर खड्डे

७ ( टुडे १ पान, सेकंड मेन)

rat१०p६.jpg -
२४M८२७१७
राजापूर ः महामार्ग ते गंगातीर्थ या रस्त्याची झालेली दुर्दशा.

rat१०p७.jpg ः
P२४M८२७१८
रस्त्यामध्ये वळणावर पडलेले खड्डे आणि उकटलेले डांबरीकरण.

गंगातीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्‍या रस्त्यावर खड्डे

वाहनचालकांची कसरत; डागडुजीची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० ः राजापूर शहराजवळ मुंबई-गोवा महामार्गावरून उन्हाळे येथील गंगातीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्‍या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना तारवेरची कसरत करावी लागत आहे. हा मार्ग अरूंद अन् नागमोडी वळणांचा असल्यामुळे वाहने चालवणे म्हणजे चालकांची परीक्षाच. त्यात खड्ड्यांची भर पडली आहे. सध्या गंगेच्या आगमनामुळे वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्पुरती डागडुजी तरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मागील महिन्यात गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. तेव्हापासून पवित्र गंगास्नानासाठी राज्याच्या कानाकोपऱ्‍यासह परराज्यातूनही भाविकांची रिघ लागलेली आहे. उंच टेकडीसारख्या भागावर वसलेल्या गंगास्थानाकडे जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील फाट्यावरून गंगेच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्याचा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग सोल्ये येथील रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्‍या मार्गावरून गंगास्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून जातो. गंगास्थानाकडे जाण्यासाठी असलेले दोन्ही बाजूंचे रस्ते वळणावळणांचे आहेत. त्यापैकी मुंबई-गोवा महामार्ग ते गंगास्थान हा रस्ता वळणांचा असला तरी तीव्र उताराचा नसल्याने या रस्त्याने जाणे वाहनचालकांकडून अधिक पसंत केले जात आहे. सुमारे तीन-चार कि.मी. लांबीच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरील डांबरीकरणाचा बहुतांश भाग उखडून गेला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर डांबर कमी आणि धुरळा जास्त अशी स्थिती आहे. आधीच अरूंद अन् नागमोडी वळणे त्यामध्ये आता खड्ड्यांची भर यामुळे वाहने चालवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. काहीवेळा या रस्त्यामध्ये पडलेले मोठमोठे खड्डे चुकवताना अपघातही होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुरवस्था झालेल्या या रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
-------
चौकट

दरवेळी फक्त चर्चाच

गंगास्थानाकडे जाणाऱ्‍या या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची गंगामाईचे आगमन आणि त्यानंतर वास्तव्याच्या काळामध्ये दरवेळी चर्चेचे गुऱ्‍हाळ होते. बांधकाम विभागाकडून या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली जाते. गंगा गेल्यानंतर मात्र ‘येरे माझ्या मागल्या’ अशी स्थिती या रस्त्यांची होते. हे टाळून या रस्त्याचे कायमस्वरूपी चांगल्याप्रकारे खडीकरण आणि डांबरीकरण कसे करता येईल याकडे बांधकाम विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी भाविकांसह ग्रामस्थांकडून केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com