गुहागरला बीच शॅक उभारण्याची घोषणा कागदावरच

गुहागरला बीच शॅक उभारण्याची घोषणा कागदावरच

८ (टूडे १ साठी, अँकर)

- rat१०p१९.jpg-
P२४M८२७६९
गुहागर किनारा.

गुहागरतील बीच शॅकची घोषणा अद्याप कागदावरच

तीन वर्षांपूर्वीचे नियोजन ; सरकार बदलल्यानंतर दुर्लक्ष, रोजगार निर्मितीला ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर बीच शॅक उभारण्याची घोषणा तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने केली होती. स्थानिकांना रोजगार आणि कोकणात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी गोव्याप्रमाणे आनंद कुट्या भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. प्रत्यक्षात तीन वर्षे उलटली तरी प्रकल्प कागदावरून समुद्रकिनाऱ्यावर आलाच नाही.
निळाशार समुद्र, रूपेरी वाळू, विस्तीर्ण किनारे, नारळी-पोफळीच्या गर्द बागा हे कोकणाचे वैशिष्ट्य. म्हणूनच कोकणातील निसर्गसौंदर्याचा आणि ताज्या मासळीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावले आपोआप कोकणाकडे वळतात. पर्यटकांना निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा यासाठी बीच शॅक प्रकल्पाची संकल्पना होती. विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी ही संकल्पना मांडली होती. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. ज्या समुद्रकिनाऱ्यावर सरकारच्या जागा आहेत त्या भाड्याने देऊन तेथून सरकारलाही उत्पन्न मिळवण्याचे प्रयत्न सरकार करणार होते. कोकणातील आठ किनाऱ्यांवर प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार होता. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि आरेवारे समुद्रकिनाऱ्याचा समावेश होता. स्थानिकांनीही सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले होते. तीन वर्षांनंतरही या प्रकल्पाला गती मिळालेली नाही.
दरम्यान, मागील ३ वर्षातील राजकीय घडामोडींमुळे राज्यातील सरकार बदलले. सुरवातीला तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात बीच शॅक ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला होता. सरकार बदलल्यामुळे पुन्हा जुन्या सरकारचे निर्णय बासनात गुंडाळले गेले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना देणारा बीच शॅकचा निर्णय जैसे थेच राहिला आहे.

........
कोट १

सरकारच्या जागा भाडेपट्ट्याने देण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. सर्व बाबी तपासून झाल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकेल. पर्यटन विभागाने सीआरझेड मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. नगरविकास विभागाकडून ते अंतिम मंजुरीसाठी पाठवले जातील.

- अशोक चकोर, कार्यकारी अभियंता, पर्यटन विकास महामंडळ
.............
कोट २

समुद्रकिनाऱ्यांवर बीच शॅक उभारण्याची घोषणा तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने केली होती. हा प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात आला असता तर गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध झाल्या असत्या. या माध्यमातून पर्यटकांची संख्या वाढली असती आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असता; परंतु सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे.

- विनायक मुळ्ये, गुहागर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com