नरडवे कोकेवाडीत पाण्यासाठी वनवन

नरडवे कोकेवाडीत पाण्यासाठी वनवन

82793
नरडवे ः येथील कोकेवाडीतील पिण्याच्या पाण्याची कच्ची विहीर.
---------
82794
नरडवे ः स्थानिकांनी श्रमदानाने विहिरीतील गाळ काढून पाण्याचा वापर सुरू केला आहे.
-----------

नरडवे कोकेवाडीत पाण्यासाठी वणवण

भीषण टंचाई ः विहिरीतील गाळ काढून थेंबाथेंबासाठी धडपड


सकाळ वृत्तसेवा
कनेडी, ता. १० ः ज्या गावामध्ये तब्बल एक हजार कोटी खर्चाचे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे अशा गावात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करण्याची वेळ आली आहे. आपल्या पूर्वजांनी पिढ्यान् पिढ्या कसलेली जमीन धरण प्रकल्पाला गेल्यानंतर आता या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नरडवे कोकेवाडीतील ग्रामस्थांना श्रमदानातून विहिरीतील गाळ उपसा करून पिण्यासाठी पाणी मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
उन्हाळ्याची पाणी टंचाई, वाढलेली उष्णता यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नरडवे गावातील कोकेवाडीतील ग्रामस्थांची तशी ही मोठी समस्या आहे. नदीपात्रालगत पिण्याच्या पाण्याची विहीर गाळात असल्याने पाणीसाठा होत नाही. त्यामुळे स्थानिकांचे पाण्याविना हाल सुरू झाले आहेत. सध्या या विहिरीची पाणी पातळी खालावली असून विहिरीत गाळ साचला होता. त्यामुळे नागिरकांना पाणीच मिळत नव्हते. अखेर स्थानिकांनी पाण्यासाठी वणवण करण्यापेक्षा विहिरीतील गाळ उपसण्याचा निश्चिय करून काम सुरू केले. त्यामुळे किमान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे. या गावात मध्यम पाटबंधारे विभागाच्या धरणाचे काम गेली २५ वर्षे रखडले आहे. गावकऱ्यांनी त्यासाठी शेत जमीनही दिली; पण त्याचा मोबदला मिळत नाही. पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. धरणाच्या बंधाऱ्याचे काम ८० टक्के झाले आहे. धरणात पाणीसाठा केव्हाही करता येईल अशी स्थिती आहे; पण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने काम थांबले आहे. अशा गावातील कोकेवाडीत आता पाण्याच्या टंचाईचे सावट स्थानिकांना सतावत आहे. मुंबईचे चाकरमानी गावात आले असून त्यांना या टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com