कुडाळ-गवळदेव 
परिसरात आग

कुडाळ-गवळदेव परिसरात आग

कुडाळ-गवळदेव
परिसरात आग
कुडाळ ः कुडाळ-गवळदेव येथील बीएसएनएल कार्यालयानजीक मोकळ्या भागात गुरुवारी (ता. ९) सायंकाळी अचानक आग लागली. यामुळे रस्त्यालगतच्या स्टॉलधारकांना धोका निर्माण झाल्याने त्वरित अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा धोका टळला. ही घटना सायंकाळी ४ वा. च्या सुमारास घडली. कुडाळ बीएसएनएस कार्यालयानजीक एक मोकळा भूखंड आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडी, झुडपे व गवत वाढले आहे. या जागेत अचानक आग लागली. या ठिकाणी कुडाळ-वेंगुर्ले रस्त्यानजीक काही स्टॉल आहेत. ही आग पेटत रस्त्यालगत भागात आली. त्वरित अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करून ही आग आटोक्यात आणली. लगतच बीएसएनएसचे कार्यालय असून, या भागातही ही आग पसरण्याचा धोका होता. योग्य ती सतर्कता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला.
..........
तेरवण-मेढे येथे
मोटारीला अपघात
दोडामार्ग ः तेरवण-मेढे येथील तीव्र वळणावर एका मोटारीला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार थेट घळणीत कलंडली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मूळचे घोटगेवाडी व सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले काहीजण मोटारीने गुरुवारी मूळ गावी येत होते. वीजघर-दोडामार्ग राज्यमार्गावर तेरवण-मेढे येथे मोटार आली असता तेथील तीव्र वळणाचा चालकास अंदाज आला नाही. परिणामी त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले अन् गाडी थेट रस्ता सोडून घळणीत उलटली. या मार्गाने जाणाऱ्या काही चालकांनी सर्व प्रवाशांना मोटारीतून बाहेर काढले.
..............
नेरुर येथे रविवारी
आरोग्य चिकित्सा
कुडाळ ः जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित (कै.) यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर, कॉलेज ऑफ नर्सिंग आणि कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कुडाळ तालुका पत्रकार संघ, बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग, प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल आणि लेट मिसेस इंगेट्राऊट नाईक विद्या प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन नेरुर येथे रविवारी (ता. १२) करण्यात आले आहे. शिबिरामध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सिंधुदुर्गातील डॉ. संजय निगुडकर, डॉ. संजीव आकेरकर, डॉ. योगेश नवांगुळ, डॉ. संदेश कांबळे, डॉ. आदेश पालयेकर, डॉ. गायत्री पालयेकर, डॉ. शंतनू पालकर, डॉ. गौरव घुर्ये, डॉ. चरमचेर्ला हेमचंद, डॉ. योगिता राणे यांच्यासह विविध क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन व उपचार करणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रा. वैशाली ओटवणेकर, शरावती शेट्टी, डॉ. रोहन भांगरे, शंकर माधव यांच्याशी सपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com