वीररत्न बाजीप्रभू नाटकाचे प्रयोग

वीररत्न बाजीप्रभू नाटकाचे प्रयोग

३३ (पान ५ साठी)


-rat१०p२२.jpg-
२४M८२८०९
रत्नागिरी : पत्रकार परिषदेत माहिती देताना राजापूर-लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड.
--------------

जिल्ह्यात वीररत्न बाजीप्रभू नाटकाचे चार प्रयोग

सुभाष लाड ः वेरळ, लांजा, पाचलसह रत्नागिरीचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या (मुंबई) मदतीकरिता वीररत्न बाजीप्रभू या ऐतिहासिक नाटकाचा खेळ आयोजित केला आहे. श्री महालक्ष्मी कलामंच (मुंबई) निर्मित या नाटकाचे चार प्रयोग होणार आहे. वेरळ, पाचल, रत्नागिरी व लांजा येथे हे प्रयोग होणार असून विद्यार्थी, रसिक, पालकांनी नाटकाला यावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी पत्रकार परिषदेत केले.
वेरळ येथे रविवारी (ता. १२), पाचलमध्ये १३, रत्नागिरीत १४ मे रोजी स्वा. सावरकर नाट्यगृहात व १५ मे रोजी लांजा हायस्कूलच्या रंगमंचावर हे प्रयोग होणार आहेत. लाड यांच्यासमवेत शौकत गोलंदाज, भार्गव घाग, दिगंबर शिंदे आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. लाड म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर वसलेल्या राजापूर-लांजा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेली राजापूर-लांजा नागरिक संघ ही संस्था विकासात्मक काम करत आहे. संस्थेमार्फत ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, नदी जलपूजन, वृक्षारोपण, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्यवाटप, दिव्यांगांना मदत, स्थानिक नववधू सन्मान, वाचनालयांना पाठबळ, ग्रामीण संस्कृतीचे जतन असे उपक्रम राबवले जातात.
संघ अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. संस्थेने गेल्या दशकभरात आपल्या कामाचे स्वरूप बदलत साहित्य, शिक्षण, संस्कृती, कला, क्रीडा, आरोग्य, कृषी पर्यटन व पर्यावरणक्षेत्रात सातत्यपूर्ण काम करत आहे. संघाच्या उपक्रमांना बळ मिळण्याकरिता वीररत्न बाजीप्रभू या ऐतिहासिक नाटकाचा खेळ आयोजित केला आहे. या नाटकाचे लेखन विद्याधर शिवणकर, दिग्दर्शन प्रकाश लाड, सूत्रधार संजय मांडवकर आहेत. कलाकर मुळचे लांजा, राजापूरमधील असून मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त राहतात. हे प्रयोग रत्नागिरीत करण्याकरिता सर्व कलाकार उत्सुक असल्याचे लाड यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com