कापसाळमधील कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता संघ विजेता

कापसाळमधील कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता संघ विजेता

पान ५

८२८१०

कापसाळमधील कबड्डी स्पर्धेत
दुर्गामाता संघ विजेता
चिपळूण ः कापसाळ येथील माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भीमराज क्रीडा मंडळांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेत कोंडमळा येथील दुर्गामाता संघ विजेता तर धामणवणे येथील सिद्धार्थ क्रीडा मंडळाचा संघ उपविजेता ठरला. आई सुकाई खेर्डी हा संघ तृतीय व सिद्धिविनायक कळकवणे हा संघ चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरला. माता रमाई महिला मंडळाच्या व भीमराज क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते विजेत्या दुर्गामाता संघाला १२ हजार १२५ रुपये व आकर्षक चषक आणि उपविजेत्या सिद्धार्थ क्रीडा मंडळाला १० हजार २५ रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. तृतीय क्रमांकास ७ हजार २५ रुपये व चषक देण्यात आला. उत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक दुर्गामाता संघाचा गणेश घाणेकर याला, उत्कृष्ट चढाईपटू सिद्धार्थ क्रीडा मंडळाचा धम्मा सावंत यांना गौरवण्यात आले. कापसाळ येथील भीमराज क्रीडा मंडळ या संघाला शिस्तबद्ध संघ म्हणून गौरवण्यात आले.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com