उकाड्यामुळे दररोज ७३ मेगावॅट वाढीव मागणी

उकाड्यामुळे दररोज ७३ मेगावॅट वाढीव मागणी

३५ (पान ५ साठी, मेन)


-rat१०p२६.jpg-
P२४M८२८२६
रत्नागिरी ः असह्य उकाड्यामुळे लहाने मुले नदीत पोहण्याचा आनंद लुटत आहेत.

---------
उकाड्यामुळे रोज ७३ मेगावॅट वाढीव मागणी

महावितरण कंपनी ; विद्युत उपकरणांचा वाढला वापर, १२५ वरून थेट १९८ मेगावॅटवर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः अंगाची लाहीलाही करणाऱ्या कडक उष्म्याने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांच्या विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. उकाड्यातून शरीराला थोडा गारवा मिळावा यासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपक्रमांमुळे ही वाढ झाली आहे. जिल्ह्याची दैनंदिन वीज मागणी १२५ मेगावॅट आहे. एप्रिल, मे महिन्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे ही मागणी १९८ मेगावॅटवर गेली. त्यामुळे सुमारे ७३ मेगावॅट विजेची मागणी वाढली आहे.
विजेची उपलब्धता समाधानकारक असल्याने या बिकट परिस्थितीतह भारनियमनाची वेळ महावितरण कंपनीने ग्राहकावर आणलेली नाही, हे विशेष. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात तापमानाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. उकाड्याने नागरिक हैराण आहेत. अवकाळी पावसाने पूर्णत: पाठ फिरवल्याने उष्म्यात आणखी वाढ झाली आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. त्यापासून आराम आणि गारवा मिळावा यासाठी एसी (वातानुकूलित यंत्रणा), पंखे, कुलर आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा दिवस-रात्र वापर केला जात आहे. परिणामी, विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे.
ऑक्टोबर हीटमध्ये असलेल्या मागणीपेक्षाही एप्रिल, मे महिन्यात विजेची मागणी वाढली आहे. जिल्ह्याची सरासरी दैनंदिन वीजमागणी १२० ते १२५ मेगावॅट इतकी आहे. ३० एप्रिल २०२४ ला ती १९८ मेगावॅट इतकी होती तर आता ९ मे रोजी १७४ मेगावॅटपर्यंत आहे. सरासरी काढली तर सुमारे ७३ मेगावॅट विजेची मागणी वाढली आहे.
-------------
चौकट
रत्नागिरी जिल्हा ग्राहकसंख्या

* घरगुती - ५ लाख २३ हजार
* वाणिज्य - ३७ हजार ६९७
* औद्योगिक - ५ हजार ६४३
* कृषी - १९ हजार ९३०
* पथदिवे - २ हजार ०२३
* सार्वजनिक पाणीपुरवठा- २ हजार ९४९
* सार्वजनिक सेवा शासकीय - ३ हजार २९०
* सार्वजनिक सेवा इतर- २ हजार ९९६
* इतर - १ हजार ४६०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com