काँग्रेस अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

काँग्रेस अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

४६ ( पान ४ मेन )

खेड काँग्रेसअंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

तिघांवर कारवाई ; पलटवारासाठी तालुकाध्यक्षावर टीका
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १० : इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारापासून अलिप्त राहात पक्षहिताला बाधा आणल्याचा ठपका ठेवत येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी तिघांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. यामुळे पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर आली असतानाच काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांनीही तालुकाध्यक्षांच्या निष्क्रिय कारभाराचा पाढा वाचत त्यांना हटवावे, अशी मागणी करत पलटवारही केला.
या घडामोडींमुळे येथील काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळणार असून पक्षनेतृत्व कोणती भूमिका घेते याकडेच कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी शहराध्यक्ष अनिल सदरे, माजी नगरसेवक बशीर मुजावर व काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. तिघांची राजकीय भूमिका पक्षहिताला बाधा आणणारी असून हानिकारक ठरत असल्यामुळेच निलंबन करण्यात येत असल्याचे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी स्पष्ट केले.
किरण तायडे यांनी तालुकाध्यक्ष गौस खतीब यांच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. तालुकाध्यक्ष खतीब यांना सडेतोड उत्तर देत त्यांच्या तालुकाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा ठराव पारित करण्यात आल्याचा सूर निलंबित तिन्ही पदाधिकाऱ्यांनी आळवला आहे. तालुकाध्यक्ष खतीब यांच्या अकार्यक्षमतेमुळे कार्यकर्ते नाराज आहेत. याचमुळे त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट केले. दोन्ही गटाच्या भूमिकेमुळे येथील काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असतानाच काँग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या जिल्हाध्यक्षांना निलंबित करण्याचा अधिकार तालुकाध्यक्ष गौस खतीब यांना नेमका दिला कुणी, असा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी एकप्रकारे बालिश व पोरकटपणाच केल्याची खिल्ली किरण तायडे यांनी उडवली आहे. तालुकाध्यक्षांची भूमिका दुटप्पी स्वरूपाची असून, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडत पक्षवाढीसाठी त्यांनी काहीच केले नसल्याचा आरोपही केला आहे. त्यांच्याकडून गलिच्छ राजकारण सुरू असून त्यांच्या कृतीचा निषेध करतो असेही तायडे यांनी स्पष्ट केले.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com