राजन साळवी सातत्याने एकनाथ शिंदेंच्या संपर्कात

राजन साळवी सातत्याने एकनाथ शिंदेंच्या संपर्कात

पान १ साठी
आजच्या पानावरून फोटो घेणे
मला खासदार करण्यास महायुती सक्षम
किरण सामंत ः आमदार साळवी सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : मला खासदार करण्यासाठी महायुतीमधील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सक्षम आहेत. राजन साळवींनी माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी. लांजा-राजापूर विधानसभेची जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. साळवी ठरल्याप्रमाणे सातत्याने एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाणावर ही जागा लढावी अन्यथा मी लांजा-राजापूर मतदारसंघातून धनुष्यबाण चिन्हाचा उमेदवार असेन, अशा खणखणीत शब्दात किरण सामंत यांनी राजन साळवी यांच्या विधानाचा समाचार घेतला.
किरण सामंतांचे कोकणात चांगले काम आहे. अशा नेत्याला महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळेल, असे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्याला किरण सामंत यांनी चोख उत्तर आणि मित्रत्वाचा सल्ला दिला.
सामंत म्हणाले, ‘‘भविष्यात लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजन साळवींनी प्रथम आपली आमदारकी वाचवावी. राजन साळवी सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, याची मला कल्पना आहे. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश न केल्यास मी स्वतः लांजा राजापूर मतदारसंघातून धनुष्यबाण या चिन्हाचा उमेदवार असेन.’’


भांडाफोड होण्याची शक्यता
किरण सामंत यांच्या या वक्तव्याने राजन साळवीदेखील राजकीय पटलावर आले आहेत. फोडाफोडीच्या राजकारणामध्ये ते कोणाच्या संपर्कात होते, याचा जणू किरण सामंत यांनी खुलासाच केला आहे. सामंत-साळवी यांच्यातील हे द्वंद्व अनेक राजकीय घडामोडींचा भांडाफोड करणारे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com