सोमवारपासून दिवसाआड पाणी

सोमवारपासून दिवसाआड पाणी

पान ३ साठी मेन
रत्नागिरीत सोमवारपासून दिवसाआड पाणी
नगर पालिकेकडून नियोजन ः उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : संभाव्य भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मान्सूनच्या आगमनापर्यंत धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवण्यासाठी पालिकेने पुन्हा पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. सोमवार (ता. १३) पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शहराचे दोन भाग करून हा पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी तुषार बाबर आणि पाणी अभियंता अविनाश भोईर यांनी केले आहे.
शहरात शीळ धरण या एकमेव जलस्रोतातून पाणीपुरवठा केला जातो. अलनिनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेचा या वर्षीच्या मान्सूनवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे यावर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाले. परिणामी, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात कमी साठा झाला तसेच उष्णतेच्या लाटांमुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे साठा कमी होत आहे. धरणातील साठा दिवसेंदिवस वेगाने कमी होत आहे.
सध्या शीळ धरणात ०.८१४ द.ल.घ.मी. इतका उपयुक्त साठा आहे म्हणजेच २० टक्केच साठा शिल्लक आहे. यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्यास व धरणातील उपयुक्त साठा संपुष्टात आल्यास दुसरा कोणताही जलस्रोत तथा पर्याय उपलब्ध नसल्याने शहरात भीषण टंचाई उद्भवू शकते. परिणामी, धरणातील पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी कपातीचा निर्णय घेतला आहे.


... दोन टप्प्यात असा पाणीपुरवठा

सोमवारी ः सन्मित्रनगर, गवळीवाडा, आंबेशेत, लांबे चाळ, माळनाका, मारुती मंदिर, एस. व्ही. रोड, हिंदू कॉलनी, आनंदनगर, विश्वनगर, नूतननगर, अभ्युदयनगर, उदयमनगर, नरहर वसाहत, शिवाजीनगर, साळवी स्टॉप, रमेशनगर, छत्रपतीनगर, सहकारनगर, विष्णूनगर, नवलाईनगर, चाररस्ता मजगाव रोड, स्टेट बॅंक कॉलनी, म्युनिसिपल कॉलनी, एकता मार्ग, राजापूरकर कॉलनी, कोकणनगर जुने, कीर्तीनगर, कोकणनगर-फेज नं. ४ या भागाला होणार पाणीपुरवठा.

मंगळवारी ः राजिवडा, निवखोल, शिवखोल, गवळीवाडा, बेलबाग, एक चवंडेवठार, घुडेवठार, खडपेवठार, मांडवी, रामआळी, मारुती आळी, गोखले नाका, राधाकृष्ण नाका, झारणी रोड, जेलरोड परिसर, धनजीनाका, आठवडा बाजार, झाडगाव, टिळक आळी, शेरेनाका, तेली आळी, जोशी पाळंद, वरची आळी, खालची आळी, लघुद्योग, मुरूगवाडा, पंधरामाड, मिरकरवाडा, राजवाडी, ८० फुटी हायवे परिसर, पेठकिल्ला, मांडवी, वरचा फगरवठार, पोलिसलाईन, तांबट आळी, भुवड आळी, आंबेडकरवाडी, राहुल कॉलनी, फातिमा नगर, आझाद नगर, कुंभारवाडा, थिबा पॅलेस परिसर, आदमपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com