''पदवीधर''साठी मनसेकडून 
खेडेकरांना उमेदवारी द्या''

''पदवीधर''साठी मनसेकडून खेडेकरांना उमेदवारी द्या''

Published on

‘पदवीधर’साठी मनसेकडून
खेडेकरांना उमेदवारी द्या’
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १० : पदवीधर निवडणूक येत्या १० जूनला होणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसे सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कोकणातील मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आहे. उच्चशिक्षित आणि सुशिक्षित बेरोजगारीकडे विशेष लक्ष देण्यासाठी एक तरुण नेतृत्व म्हणून खेडेकर यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी दिली. आज अनेक तरुण-तरुणी पदवीधर असूनही बेकार आहेत. राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून बेकारीचा प्रश्न मनसेकडून नक्कीच सोडवला जाईल. यासाठी उच्चशिक्षित उमेदवार म्हणून खेडेकर यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी विनंती आम्ही सर्व पदाधिकारी राज ठाकरे, अमित ठाकरे यांची भेट घेऊन करणार आहोत. कोकण पदवीधर मतदारसंघातून खेडेकर नक्कीच विजयी होतील, असा विश्वास वाईरकर यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com