‘ग्रिन लिफ रेटिंग’ पर्यटनासाठी पुरक

‘ग्रिन लिफ रेटिंग’ पर्यटनासाठी पुरक

82855
सिंधुदुर्गनगरी ः स्वच्छता ग्रिन लिफ रेटिंग कार्यक्रम आयोजनाबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी किशोर तावडे. शेजारी इतर.

‘ग्रिन लिफ रेटिंग’ पर्यटनासाठी पूरक

किशोर तावडे ः जिल्ह्यातील हॉटेल, लॉजिंग व्यावसायिकांना सहभागाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास या आस्थापनांना ग्रिन लिफ रेटिंगअंतर्गत मिळणारे १ ते ५ लिफ रेटिंग जिल्ह्यातील पर्यटनाकरिता पूरक ठरणार, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.
स्वच्छता ग्रिन लिफ रेटिंग कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी काल (ता.९) जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकंरद देशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विनायक ठाकूर, सर्व प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी (पं.स.) आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी तावडे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास यांचे स्वच्छता ग्रिन लिफ रेटिंगअंतर्गत गुणांकन होऊन १ ते ५ लिफ नामांकन देण्यात येणार आहे. या रेटिंगच्या माध्यमातून देशी-विदेशी पर्यटक येथील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास आस्थापनांना भेट देतील. त्याचा फायदा जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढण्याकरिता होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास व्यावसायिकांनी या कार्यक्रमांत सहभाग नोंदवावा.’’
पाणी पुरवठा स्वच्छता मंत्रालय व पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत जिल्ह्यातील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास यांचे घनकचरा व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन या तीन निकषांवर गुणांकन होणार आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत ८० गुण, मैला गाळ व्यवस्थापनकरिता ८० गुण, तर सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत ४० गुण असे २०० गुण निश्चित केले आहेत. यामध्ये १०० ते १३० गुण ज्या आस्थापनेस मिळणार आहेत, त्यांना १ लिफ, १३० ते १८० गुण मिळविणाऱ्या आस्थापनेस ३ लिफ, तर १८० ते २०० गुण प्राप्त करणाऱ्या आस्थापनेस ५ लिफ गुणांकन प्राप्त होणार आहे. मात्र, १ लिफ गुणांकन प्राप्त करण्याकरिता मैला गाळ व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत किमान ४० गुण, तर सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत किमान २० गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. ३ लिफ गुणांकन प्राप्त करण्याकरिता मैला गाळ व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत किमान ५० गुण, तर सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत किमान २० गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. ५ लिफ गुणांकन प्राप्त करण्याकरिता मैला गाळ व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत किमान ६० गुण, तर सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत किमान ३० गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
स्वच्छता ग्रिन लिफ रेटिंगअंतर्गत तालुकास्तरावर पडताळणी समितीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पर्यटन किंवा उद्योग क्षेत्रातील, पाणी पुरवठा विभाग (तांत्रिक बांबी पाहणारे) अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन तथा जिल्हा समन्वयक (स्वच्छ भारत मिशन) सदस्य सचिव, पर्यटन विभाग, एमटीडीसी, जिल्हा प्रतिनिधी सदस्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) सदस्य, जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने पर्यटन, हॉटेल उद्योगातील प्रतिनिधी सदस्यांची समिती स्थापन करून जिल्ह्यातील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास यांची तपासणी करणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) विनायक ठाकूर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com