साई पाडणार

साई पाडणार

साई रिसॉर्टचे बांधकाम
दहा दिवसांत पाडणार
न्यायालयात सदानंद कदम यांची हमी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : दापोली येथील साई रिसॉर्ट बेकायदा बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल केलेले व्यावसायिक सदानंद कदम यांनी रिसॉर्टचा बेकायदेशीर भाग जमीनदोस्त करण्याची तयारी दर्शवली आहे. महिनाभराच्या आत हे बांधकाम पाडण्यात येणार होते त्यासाठी होणारा खर्च देखील ते स्वतः च उचलणार होते मात्र हे बांधकाम ते काही कारणास्तव पाडू शकले नाहीत. येत्या दहा दिवसांत हे बांधकाम स्वखर्चाने जमीनदोस्त करू अशी हमी त्यांनी आज उच्च न्यायालयाला दिली.
दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. रिसॉर्टच्या बांधकामामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करीत सरकारने कारवाई सुरू केली. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा करीत व्यावसायिक सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. साई रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या ६ डिसेंबर २०२३ च्या आदेशाला त्यांनी आव्हान दिले असून त्यांच्या याचिकेवर न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठापुढे आज सुनावणी झाली. सदानंद कदम यांनी साई रिसॉर्टमधील अतिरिक्त बांधकाम महिनाभरात स्वखर्चाने पाडण्याची तयारी मागील सुनावणीवेळी दर्शवली होती. मात्र काही कारणास्तव हे बांधकाम पाडू न शकल्याने कदम यांचे वकील साकेत मोने न्यायालयाची आज माफी मागितली. सुनावणीला सदानंद कदम उपस्थित होते त्यांनीही न्यायालयाची माफी मागितली व पुढील दहा दिवसात हे बांधकाम स्वखर्चाने पाडणार असल्याची हमी न्यायालयाला दिली. न्यायालयाने याची दखल घेत या प्रकरणावरील सुनावणी ११ जूनपर्यंत तहकूब केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com