पालेकोंड ग्रामोत्सवात मनमोहत कलाविष्कार

पालेकोंड ग्रामोत्सवात मनमोहत कलाविष्कार

५ ( पान ६ )
-----------

Rat११p७.jpg -
२४M८२९२८
पालेकोंड ः जल्लोष पालेकोंडचा या कलाविष्कारात रंगलेला नृत्यविष्कार.


पालेकोंड ग्रामोत्सवात मनमोहक कलाविष्कार

लहान मुलांनी जिंकली मने; जलधार टीमचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.११ -तालुक्यातील पालेकोंड या गावी वार्षिक ग्रामोत्सव नुकताच संपन्न झाला. ग्रामस्थ, मुंबईकर यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या ग्रामोत्सवात कलाविष्काराचे विविध रंग पाहायला मिळाले. लहान मुलांच्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
पालेकोंड गावाचा वार्षिक ग्रामोत्सव ३ ते ५ मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पहिल्या दोन दिवशी श्रीसतीदेवी चषक स्पर्धेचे टेनिस क्रिकेटचे लाईव्ह सामने आयोजित करण्यात आले. या स्पर्धेत भिंगळोली प्रथम, म्हाप्रळ द्वितीय, कळकवणे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. ५ मे रोजी श्रमशक्ती भवन येथे श्रीसत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. प्रथम ग्रामदेवता श्रीसतीदेवी मातेचे मंदिरात दर्शन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. महाआरती, पारंपरिक खेळ, हळदीकुंकू समारंभ घेण्यात आले. गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सुस्वर भजनाने वातावरण भक्तीमय झाले. रात्री गावासाठी योगदान देणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी, शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केलेले यशस्वी विद्यार्थी, विविध खेळात क्रमांक मिळवलेले विजेते व जिल्हा परिषद रत्नागिरी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या जलधार या लघुपटाच्या टीमचा सत्कार करण्यात आला. यानंतर जल्लोष पालेकोंडचा या विविध गुणदर्शनाच्या संगीतमय नृत्य कालाविष्काराचे सादरीकरण झाले. यामध्ये गावातील मुलांनी आपल्या कलागुणांचे अप्रतिम दर्शन उपस्थितांना घडविले. सूत्रसंचालन राजेश कुळे यांनी केले.
-------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com